आटपाडीत मका, ज्वारी खरेदी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:27 AM2021-04-24T04:27:20+5:302021-04-24T04:27:20+5:30
—————— बेडग-विठ्ठलनगर रस्ता धोकादायक टाकळी : बेडग (ता. मिरज)पासून विठ्ठलनगरकडे जाणारा अडीच किलाेमीटरचा रस्ता हा नुकताच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ...
——————
बेडग-विठ्ठलनगर रस्ता धोकादायक
टाकळी : बेडग (ता. मिरज)पासून विठ्ठलनगरकडे जाणारा अडीच किलाेमीटरचा रस्ता हा नुकताच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आला आहे. परंतु, या मार्गावरील एका धोकादायक तीव्र वळणामुळे छोटे-मोठे अपघात वढले आहेत. या वळणावर नवीन डांबरीकरण झाल्यापासून दोन चारचाकी व चार ते पाच दुचाकीस्वार यांचे अपघात घडले आहेत. डांबरीकरणामुळे वाहनधारकांच्या गतीमध्ये वाढ झाली आहे.
——————
आयर्विन पूल खुला केल्याने नागरिकांची सोय
सांगली : गेल्या काही महिन्यांपासून बंद असणारा आयर्विन पूल लहान वाहने व दुचाकींसाठी खुला केल्याने मिरज पश्चिम व वाळवा तालुक्यातील नागरिकांची सोय झाली आहे. दरम्यान, आयर्विन पुलाशेजारील झुडपे काढण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
——————
भाजीपाला विक्रेत्यांचे हाल
सांगली : सांगली शहरात मारुती चौकात होलसेल भाजीपाला बाजाराच्या साैद्याची जागा महापालिकेने सुरक्षेसाठी सील केली आहे. यामुळे भाजीपाला
विक्रेत्यांचे हाल होत आहेत. आता भाजीपाला खरेदीसाठी शहरातून चार किलाेमीटर अंतरावरील विष्णू अण्णा फळमार्केटमध्ये जावे लागत आहे. येथेही जागा देण्यास तेथील व्यवस्थापनाचा विराेध आहे. यामुळे भाजीपाला विक्रेत्यांचे हाल सुरू आहेत.
—————————-
राममंदिर-सिव्हिल रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्याची मागणी
सांगली : शहरातील राम मंदिर चोक ते सिव्हिल हॉस्पिटल रस्ता गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. रस्त्याच्या बांधकामासाठी हा मार्ग बंद केला आहे. परिणामी रुणवाहिका व इतर वाहनांना दूरच्या रस्त्याने जावे लागत आहे. रस्त्याचे काम तत्काळ संपवून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी होत आहे.
——————————
निंबळकमध्ये औषध फवारणी
आटपाडी : निंबळक (ता. आटपाडी) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने ट्रॅक्टरच्या साहाय्याने गावातील सर्वच ठिकाणी औषध फवारणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी सर्वच गावात लोकांनी काळजी घ्यावी, अनावश्यक घराबाहेर पडू नका, मास्कचा वापर सातत्याने करावा, वारंवार हात धुवावेत, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता बंडगर यांनी केले.
————————
कालव्यातून पाणीचाेरी
मांजर्डे : तासगाव तालुक्याच्या पूर्व भागाच्या शेतीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तयार केलेल्या विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेच्या पाण्याची अज्ञात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात चोरी सुरू आहे. सततच्या होणाऱ्या पाणी चोरीमुळे अनेकदा योजना बंद ठेवण्याची वेळ पाटबंधारे विभागावर येत आहे. पाणीचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.