‘अ‍ॅट्रॉसिटी’मुळे लोकशाहीचा मुडदा, भिडे गुरुजींचा आरोप : चौकशीला तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 03:56 AM2018-01-06T03:56:08+5:302018-01-06T03:56:25+5:30

‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याचा देशात गैरवापर सुरू आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा असावा की नको, हे मला माहीत नाही. पण लोकशाहीत जी मूल्ये आहेत, त्यांचा मुडदा पाडण्याचे अधिकार या कायद्याच्या माध्यमातून एका गटाला आणि जमावाला दिले आहेत, असा आरोप शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला.

 'Atrocity' democracy of Mudadha, Bhide Guruji accuses: The inquiry is ready | ‘अ‍ॅट्रॉसिटी’मुळे लोकशाहीचा मुडदा, भिडे गुरुजींचा आरोप : चौकशीला तयार

‘अ‍ॅट्रॉसिटी’मुळे लोकशाहीचा मुडदा, भिडे गुरुजींचा आरोप : चौकशीला तयार

Next

 सांगली - ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याचा देशात गैरवापर सुरू आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा असावा की नको, हे मला माहीत नाही. पण लोकशाहीत जी मूल्ये आहेत, त्यांचा मुडदा पाडण्याचे अधिकार या कायद्याच्या माध्यमातून एका गटाला आणि जमावाला दिले आहेत, असा आरोप शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला.
भिडे म्हणाले, गेल्या तीन वर्षात मी वढू बुद्रुकला फिरकलेलो नाही. संभाजी महाराजांची समाधी आम्हाला श्रद्धा व स्फूर्ती देणारे स्थान आहे. कोरेगाव-भीमा येथील दंगलीबाबत माझ्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी साबळेवहिनी म्हणतात की, भिडे गुरुजींना दगड मारताना मी पाहिले आहे. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे असतील, तर पोलिसांनी तपासून पाहावे, सत्य बाहेर येईल. प्रकाश आंबेडकर यांचा बोलविता धनी कोण आहे, याची चौकशी झाली पाहिजे. गुन्हा दाखल करण्यासाठी माझे नाव घेण्यास आंबेडकरांना कोणी सांगितले, याचा उलगडा झाला पाहिजे. सर्व समाजाला कलंक लागेल, असा प्रकार सध्या सुरू आहे. अगदी राज्यसभा, लोकसभेपर्यंत या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. शासनस्तरावर तसेच सीबीआयने चौकशी करून सत्य बाहेर काढावे. मी दोषी असेन तर मला देहांताची शिक्षा द्यावी.

सिंहासन गेलेल्या मंडळींचे कारस्थान?
काही राजकारणी नेते माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून राजकीय फायदा उठविण्याचा डाव आखत आहेत. कर्जमाफीसाठी या मंडळींनी शेतकºयांचे आंदोलन पेटविले. शेतकºयांच्या बाजूने आंदोलन करणाºया नेत्यांनीही सरसकट कर्जमाफीची मागणी केली. पण यातील अनेक नेत्यांचा दोनशे-चारशे टन ऊस दरवर्षी जातो. या नेत्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी करताना काही विवेक आहे की नाही असेही भिडे म्हणाले.

भिडेंना पोलीस संरक्षण
कोरेगाव भीमा घटनेचे पडसाद सांगलीसह संपूर्ण राज्यभर उमटले असून, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यातील पाच पोलीस २४ तास त्यांच्या संरक्षणासाठी तैनात केले आहेत.

ब्राह्मण महासंघाचा या प्रकरणाशी संबंध नाही
पुणे : कोरेगाव भीमा वादाच्या प्रकरणात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांच्यावर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या वादाशी महासंघाचा काहीही संबंध नसून केवळ जातीय तेढ वाढविण्याचे हे षडयंत्र आहे, असा दावा महासंघाकडून करण्यात आला आहे. प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी भूमिका स्पष्ट केली.

Web Title:  'Atrocity' democracy of Mudadha, Bhide Guruji accuses: The inquiry is ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.