मांगले रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्याचा पोलीस निरीक्षकांडून प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:27 AM2021-05-21T04:27:02+5:302021-05-21T04:27:02+5:30
शिराळा : मांगले येथे गृह विलगीकरण कक्षात ९७ कोरोना रुग्ण आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत या सर्व रुग्णांच्या घरी जाऊन ...
शिराळा
: मांगले येथे गृह विलगीकरण कक्षात ९७ कोरोना रुग्ण आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत या सर्व रुग्णांच्या घरी जाऊन शिराळा पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार यांनी भेट दिली.
रुग्णांनी घराबाहेर पडू नये व आरोग्य विभागाच्या सूचनेचे पालन करा, अशा कडक सूचना या भेटीत त्यांनी दिल्या. तसेच ग्रामपंचायतीने रुग्णांना हवी ती मदत करावी, असे आवाहनही चिल्लवार यांनी केले.
मांगले गाव विस्ताराने मोठे आहे. तरीदेखील सुरेश चिल्लवार कोरोना रुग्णांपर्यंत पोहोचून रुग्णांशी थेट संवाद साधत आहेत. दिलखुलास चर्चा आणि आधार देण्याचे काम ते करीत असल्यामुळे रुग्णांना धीर मिळत आहे. पोलीस निरीक्षक चिल्लवार यांच्याबरोबर पोलीस कर्मचारी विनोद जाधव, दीपक हांडे, विनोद पाटील, नितीन घोरपडे, महेश साळुंखे, गावकामगार तलाठी सुभाष बागडी होते.