खानापूर घाटमाथ्यावर वळवाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:25 AM2021-05-16T04:25:42+5:302021-05-16T04:25:42+5:30
घाटमाथ्यावर गेले दोन दिवस उष्णता जाणवत होती. त्यातच चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता वर्तविली जात होती. सकाळपासून ढगाळ वातावरण झाले होते. ...
घाटमाथ्यावर गेले दोन दिवस उष्णता जाणवत होती. त्यातच चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता वर्तविली जात होती. सकाळपासून ढगाळ वातावरण झाले होते. दुपारी तीन वाजता पावसास सुरुवात झाली.
दुपारी तीनपासून रात्री आठपर्यंत पाऊस, ढगांच्या गडगडाटासह थांबून-थांबून पडत होता. सुमारे तीन-चार तास पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सखल भागात पाणी साचले आहे. पावसामुळे खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामांना गती मिळाली आहे. या वर्षी खरिपाची पेरणी वेळेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उन्हाळी पिकांबरोबर बागायत पिकांना पावसामुळे फायदा होणार आहे, तर जनावरांना ओला चारा निर्माण होण्यास मदत होणार आहे.