आंबेडकर स्टेडियमचे ऑडिट, मोजणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:42 AM2020-12-15T04:42:41+5:302020-12-15T04:42:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आजवर केलेल्या खर्चाचे व झालेले कामाचे ऑडिट करावे, रितसर ...

Audit of Ambedkar Stadium, do the counting | आंबेडकर स्टेडियमचे ऑडिट, मोजणी करा

आंबेडकर स्टेडियमचे ऑडिट, मोजणी करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आजवर केलेल्या खर्चाचे व झालेले कामाचे ऑडिट करावे, रितसर मोजणी करून अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

पँथर सेनेचे महासचिव अमोल वेटम यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिका स्थापनेपासून आजअखेर स्टेडियममध्ये केलेल्या खर्चाचे आयुक्तांनी ऑडिट करावे तसेच मोजणी करून क्रीडांगणाची हद्द निश्चित करावी. बेकायदेशीर अतिक्रमणे तत्काळ काढावीत. एका व्यायाम मंडळाने बेकायदेशीर बांधलेली भिंतही पाडण्यात यावी.

आंबेडकरी संघटनांनी स्टेडियम दुरवस्थेबाबत आवाज उठवला की, तात्पुरती जुजबी कारवाई करून विकासाच्या नावाने धूळफेक करायची व यातून सरकारतर्फे आलेल्या निधीचा गैरवापर व भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करायचा, असा प्रकार आजपर्यंत होत आला आहे. त्याच कंत्राटदाराना कंत्राट दिले जात आहे. मिळून वाटून खायचे, हे उद्योग अनेक वर्षांपासून महापालिकेतर्फे सुरू आहेत. निकृष्ट दर्जाची स्वागत कमान, प्रवेशद्वार उभारले आहे. येथे बेकायदेशीर पार्किंग होत आहे. पॅव्हेलियनची दुरवस्था तशीच आहे. आजपर्यंत कोट्यवधी निधीचा चुराडा महापालिकेतर्फे करण्यात आला; पण स्टेडियमची दुरवस्था तशीच आहे. त्यामुळे क्रीडा अधिकाऱ्यांची सर्वप्रथम चौकशी व्हावी, तसेच अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग, मालमत्ता विभाग, स्वच्छता विभाग, कंत्राटदार, मोजणी विभाग या सर्वांची खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

स्टेडियमची कागदपत्रे पुरामुळे खराब झाल्याचे अधिकारी सांगत आहेत; पण स्टेडियमबाबत सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत, हे अधिकाऱ्यांनी विसरू नये. स्टेडियमचे एकूण क्षेत्रफळ ३ लाख ३२ हजार ५४१ चौरस फूट आहे. याची मोजणी होऊन हद्द निश्चित व्हावी, असे म्हटले आहे.

Web Title: Audit of Ambedkar Stadium, do the counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.