औदुंबर-नागठाणे रस्ता उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:23 AM2020-12-23T04:23:18+5:302020-12-23T04:23:18+5:30
रस्त्याची तपासणी करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नेमके काय करतात, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. केवळ दीड किलोमीटरचा रस्ता ...
रस्त्याची तपासणी करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नेमके काय करतात, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. केवळ दीड किलोमीटरचा रस्ता करण्यास १५ दिवस गेले असून एस. टी. बस गावाबाहेरून जात आहेत. त्यामुळे बसमधून प्रवास करणारे सामान्य नागरिक, विद्यार्थी यांना दररोज पायपीट करावी लागत आहे. दहा-बारा वर्षांनंतर रस्त्याचे काम होत असूनही ते दर्जेदार नसल्यामुळे आणखी किती दिवसांनी नागरिकांना खड्ड्यांतून पुन्हा प्रवास करावा लागणार. असा प्रश्न आताच उपस्थित केला जात आहे. कित्येक महिने खड्ड्यांतून प्रवास करणाऱ्या नागरिकांना नवीन रस्त्याचा आनंद अल्पकाळच अनुभवायला मिळणार हे रस्त्याच्या कामावरून दिसत आहे तरीही याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाकडे बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा आंदाेलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
फोटो
: २२ अंकलखाेप १
ओळ : पलूस तालुक्यातील औदुंबर-नागठाणे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे हाेत आहे.