सांगली जिल्ह्यात सरासरी 0.20 मि. मी. पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 04:47 PM2019-09-13T16:47:17+5:302019-09-13T16:49:03+5:30
सांगली जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 0.20 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
सांगली : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 0.20 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज-निरंक (520.8), जत - निरंक (185.3), खानापूर-विटा -निरंक (320.4), वाळवा-इस्लामपूर -निरंक (724.9), तासगाव-निरंक (391.4), शिराळा 1.5 (1869), आटपाडी - निरंक (184.1), कवठेमहांकाळ -निरंक (296.9), पलूस -निरंक (425.5) व कडेगाव -निरंक (691.2).
जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.07 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 3 हजार 603 क्युसेक्स तर कोयना धरणातून 8 हजार 298 क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
वारणा धरणातून 3 हजार 603 तर कोयना धरणातून 8 हजार 298 क्युसेक्स विसर्ग
दिनांक 12 सप्टेंबर रोजीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 104.18 टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, आहे. धोम धरणात 13.34 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 10.03 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 24.87 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.20 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 116.10 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. आहे, असे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 3 हजार 603 क्युसेक्स तर कोयना धरणातून 8 हजार 298 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 1 लाख 31 हजार 949 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पुल सांगली येथे 21 फूट 10 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 45 फूट) तर अंकली पुल हरिपूर येथे 29 फूट 2 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 50 फूट 3 इंच).