Sangli: बागणीतील अविनाश सुर्वेंनी सर केले माउंट किलिमंजारो, आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 02:01 PM2024-08-23T14:01:47+5:302024-08-23T14:02:45+5:30
बागणी: बागणी ता. वाळवा येथील अविनाश सुर्वे यांनी आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर माउंट किलिमंजारोची यशस्वीपणे चढाई केली. त्यानंतर त्यांनी ...
बागणी: बागणी ता. वाळवा येथील अविनाश सुर्वे यांनी आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर माउंट किलिमंजारोची यशस्वीपणे चढाई केली. त्यानंतर त्यांनी तिरंग्यासह आपला फोटो सोशल मिडीयावर शेअर केला. माउंट किलिमंजारो समुद्र सपाटीपासून ५८९५ मीटर उंच आहे.
सुर्वे यांनी माउंट किलिमंजारोची चढाई १० ऑगस्टला सुरवात केली व १७ ऑगस्टला सायंकाळी ते खाली आले. यापूर्वी त्यांनी मार्च २०२४ मध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पची ५३६५ मीटर यशस्वी चढाई केली होती. त्यांना लहानपणापासून ट्रॅकिंगची आवड होती. कॉलेजमध्ये असताना विविध ठिकाणी ट्रॅकिंगला जाउन अनेक डोंगरावरती त्यांनी यशस्वी चढाई केली होती.
दुबई येथे जीइएमएस मॉर्डन ॲकेडमीमध्ये पर्यवेक्षक आणि ICSE मध्ये इंग्रजी भाषा, इंग्रजी साहित्य आणि थिएटर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिप्लोमा अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून ते काम करत आहेत. अविनाश हे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटीस नावाच्या सांधिवात आजाराने ग्रस्त आहेत तरीही ते आवड असल्याने ट्रॅकिंग करतात.