अविनाश वीरभद्रे यांचा आष्टा येथे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:26 AM2021-02-13T04:26:10+5:302021-02-13T04:26:10+5:30
आष्टा : आष्टा नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत विद्युत वाहन खरेदी केल्याबद्दल अविनाश वीरभद्रे यांचा मुख्याधिकारी डॉ. कैलास ...
आष्टा : आष्टा नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत विद्युत वाहन खरेदी केल्याबद्दल अविनाश वीरभद्रे यांचा मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण व माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांच्याहस्ते ‘वसुंधरा मित्र’ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरामध्ये विद्युत वाहन वापरास प्रोत्साहन देण्यात येत आहे. यावेळी जास्तीत-जास्त नागरिकांनी पारंपरिक वाहनाऐवजी पर्यावरणपूरक जीवनपध्दतीचा अवलंब करावा, असे आवाहन डॉ. कैलास चव्हाण यांनी केले. माझी वसुंधरा अभियानअंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी शपथ देण्यात आली.
नगरपरिषद इमारतीमध्ये विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी चार्जिंग पॉईंट सुरू करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते वीर कुदळे, माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील शिंदे, पालिकेच्या अधिकारी आसावरी सुतार, आर. एन. कांबळे, प्रणव महाजन, आनंदा कांबळे, गजानन शेळके, दत्तराज हिप्परकर उपस्थित होते.
फोटो-१२आष्टा१
फोटो: आष्टा येथे अविनाश भद्रे यांचा मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांंनी सत्कार केला. यावेळी झुंजारराव पाटील, धैर्यशील शिंदे, वीर कुदळे उपस्थित होते.