पक्ष्यांना चारा,पाणी मिळावा म्हणून पत्र्याचे शंभर डबे तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 11:06 AM2021-03-12T11:06:19+5:302021-03-12T11:24:34+5:30
wildlife Water sangli-उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता पक्ष्यांना चारा व पाणी मिळावा या हेतूने एक घास चिऊताईसाठी या उपक्रमासाठी पत्र्याचे विशिष्ट रचना असलेले शंभर डबे तयार करण्याचा मानस आहे.
सुरेंद्र दुपटे
संजयनगर/सांगली : उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता पक्ष्यांना चारा व पाणी मिळावा या हेतूने एक घास चिऊताईसाठी या उपक्रमासाठी पत्र्याचे विशिष्ट रचना असलेले शंभर डबे तयार करण्याचा मानस आहे.
उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाण्याचा व चाऱ्याचा तुटवडा जाणवत असतो. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेत अवनी फाउंडेशनने पक्ष्यांना चारा व पाणी मिळावा या हेतूने एक घास चिऊताईसाठी या उपक्रमासाठी पत्र्याचे विशिष्ट रचना असलेले शंभर डबे तयार केले आहेत. याआधीही हे डबे तयार केले आहेत. सांगली-मिरज-कुपवाडमधल्या वेगवेगळ्या उद्यानामध्ये असे डबे तयार करून लावण्यात येणार आहे अशी माहीती अवनी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप जाधव यानी दिली.
या उपक्रमामध्ये उपाध्यक्ष अभिजीत तवटे, सचिव कपिल चव्हाण, कपिल वराळे, संदीप पाटील, संतोष कलगुडगी, महेश वडर, अमोल डांगे, सल्लागार सचिन शहा, आनंद लेंगरे सहभागी झाले. याआधीही अवनी फाऊंडेशनने चित्रकला स्पर्धा, शालेय वस्तूंचे वाटप, मुक्या जनावरांसाठी पाणपोई, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण करून स्वच्छता कर्मचाऱ्यांना सलग एक्कावन दिवस नाष्टा देण्याचा उपक्रम राबविला आहे.