corona virus-बँकामधील गर्दी टाळून एटीएम व इंटरनेट बँकिंगचा वापर करा : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:41 AM2020-03-21T11:41:14+5:302020-03-21T11:46:56+5:30

ग्राहकांनी बँकेत येण्यापेक्षा इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, पैसे भरण्याचे मशीन तसेच एटीएमचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

Avoid crowds in banks and use ATMs and Internet Banking: Collector Abhijit Choudhary | corona virus-बँकामधील गर्दी टाळून एटीएम व इंटरनेट बँकिंगचा वापर करा : जिल्हाधिकारी

corona virus-बँकामधील गर्दी टाळून एटीएम व इंटरनेट बँकिंगचा वापर करा : जिल्हाधिकारी

Next
ठळक मुद्दे एटीएम व इंटरनेट बँकिंगचा वापर करा : जिल्हाधिकारी जिल्ह्यातील बँकात होणारी अनावश्यक गर्दी टाळा

सांगली: बँका या अत्यावश्यक सेवा प्रकारात येत असल्याने बँकांची शाखा कार्यालये ग्राहकांसाठी खुली राहणार आहेत. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील बँकात होणारी अनावश्यक गर्दी टाळावी.

ग्राहकांनी बँकेत येण्यापेक्षा इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, पैसे भरण्याचे मशीन तसेच एटीएमचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

बँक शाखा कार्यालयांमधील गर्दी रोखणे हे बँक कर्मचारी तथा ग्राहकांसाठी एक आवाहन आहे. ज्या व्यक्तीचे काम आहे, त्याच व्यक्तीने केवळ बँकेमध्ये यावे. अन्य कर्मचारी, तसेच इतर ग्राहक यांच्यामध्ये 3 ते 5 फुटांचे सुरक्षित अंतर ठेवावे.

जिल्ह्यात एकूण 30 बँका कार्यरत असून 483 शाखा आहेत. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि बँकाकडे असलेल्या डिजिटल बँकिंग सुविधांमुळे ग्राहक बहुतांश व्यवहार बँकामध्ये न येताही करू शकतात. रिजर्व बँकेच्या धोरणानुसार रोखीचे व्यवहार टाळा आणि डिजिटल बँकिंगचा जास्तीत जास्त उपयोग करा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

Web Title: Avoid crowds in banks and use ATMs and Internet Banking: Collector Abhijit Choudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.