आयसेरामध्ये शिवजयंतीनिमित्त विचारांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:51 AM2021-02-21T04:51:02+5:302021-02-21T04:51:02+5:30

शिराळा : शिराळा येथील आयसेरा बायोलॉजिकल या कंपनीमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी कर्मचाऱ्यांनी भुईकोट किल्ल्यावरून शिवज्योत आणली व ...

Awakening of thoughts on the occasion of Shiva Jayanti in Isera | आयसेरामध्ये शिवजयंतीनिमित्त विचारांचा जागर

आयसेरामध्ये शिवजयंतीनिमित्त विचारांचा जागर

Next

शिराळा : शिराळा येथील आयसेरा बायोलॉजिकल या कंपनीमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी कर्मचाऱ्यांनी भुईकोट किल्ल्यावरून शिवज्योत आणली व कंपनीच्या आवारात वृक्षारोपण केले.

यावेळी प्रा. डॉ. शरद जाधव यांचे ‘बुद्धिप्रामाण्यवादी शिवराय’ या विषयावर व्याख्यान झाले. यामध्ये त्यांनी शिवरायांचा बुद्धिप्रामाण्यवाद हा पैलू उलगडला. कंपनीचे संचालक नंदकुमार कदम यांनी वक्त्यांची ओळख करून दिली. कंपनीचे संचालक धैर्यशील यादव यांनी शिवजयंती साजरी करताना शिवरायांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे, असे प्रतिपादन केले. कंपनीचे संचालक विनायक शिंदे यांनी आयसेराचा चमू कोरोनावरील लसीच्या संशोधनात व्यस्त असतानाही सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांत नेहमीच अग्रेसर राहील, असा मानस व्यक्त केला. कंपनीचे अधिकारी दत्तात्रय पोवार यांनी शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्यांवर प्रकाशझोत टाकला.

Web Title: Awakening of thoughts on the occasion of Shiva Jayanti in Isera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.