जालिंदर महाडिक यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:13+5:302021-09-10T04:32:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली पाटबंधारे मंडळाचे कार्यालयीन अधीक्षक जालिंदर महाडिक यांना चेन्नई (तामिळनाडू) येथील दि. इंडियन एम्पायर ...

Awarded doctorate degree to Jalindar Mahadik | जालिंदर महाडिक यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

जालिंदर महाडिक यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगली पाटबंधारे मंडळाचे कार्यालयीन अधीक्षक जालिंदर महाडिक यांना चेन्नई (तामिळनाडू) येथील दि. इंडियन एम्पायर युनिव्हर्सिटी यांच्याकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. युनिव्हर्सिटीचे उपाध्यक्ष डॉ. के. प्रभाकर, सिने कलावंत सुमन तलवार यांच्या हस्ते महाडिक यांचा सन्मान केला. एम्पायर युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली आहे.

हौसुर (तामिळनाडू) येथे नुकत्याच झालेल्या जागतिक शांतता परिषदेच्या वेळी ही पदवी देण्यात आली. याचवेळी युनिव्हर्सल डेव्हलपमेंट कौन्सिल बेंगलोरतर्फे एक्सलन्स पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. महाडिक हे गेल्या अनेक वर्षांपासून कऱ्हाड, जि. सातारा येथील हुतात्मा अपंग संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत. अनेक गरजूंना कोणताही गाजावाजा न करता मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे. कोरोनामध्येही अनेक रुग्णांना शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. कोरोना रुग्णांना मोफत उपचाराची सेवा उपलब्ध करून देतानाच तेही कोरोना पॉझिटिव्ह झाले. कोरोनावर यशस्वी मात करून पुन्हा प्रशासकीय सेवा बजावत सामाजिक कार्यात सक्रिय झाले आहेत.

Web Title: Awarded doctorate degree to Jalindar Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.