फारुक गवंडी यांना कराडे स्मृती पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:06 AM2021-01-13T05:06:25+5:302021-01-13T05:06:25+5:30
यावेळी गुरव म्हणाले की, विज्ञानवादी कार्यकर्ता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणून पुरस्कारार्थी फारुक गवंडी यांच्याकडे बघता येईल. ते ...
यावेळी गुरव म्हणाले की, विज्ञानवादी कार्यकर्ता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणून पुरस्कारार्थी फारुक गवंडी यांच्याकडे बघता येईल. ते करीत असलेले काम तरुणांना प्रेरणादायी आहे. प्रा. प. रा. आर्डे यांनी जुन्या आठवणी जाग्या करीत फारुक गवंडी यांनी कर्ज काढून दुर्मीळ पुस्तके विकत घेतल्याचा किस्सा सांगितला.
फारुक गवंडी म्हणाले की, अंनिसमुळेच जात, धर्म, लिंग भेदापलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करण्याची व तसे जगण्याची प्रेरणा अंनिस आणि दाभोलकर, पानसरेमुळे मिळाली.
यावेळी गवंडी यांनी त्यांना मिळालेली पुरस्काराची रक्कम १५ हजार रुपये व स्वत:चे ५ हजार मृत सर्पमित्र संजय माळी यांच्या कुटुंबीयांना आणि अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते भास्कर सदाकळे यांना दिले व हा पुरस्कार अंनिसचे ज्येष्ठ हितचिंतक नंदूकाका कराडे आणि कृषी कायद्याविरुद्ध शहीद दिल्लीतील शेतकऱ्यांना समर्पित केला.
यावेळी डॉ. विजय जाधव, प्रा. वल्लभदास शेळके, वसुदा कराडे-शेटे, बाबुराव जाधव, पांडुरंग जाधव, ज्योती पाटील, ॲड. भरत शाळगावकर, राहुल थोरात, अमर खोत, प्रा. वासुदेव गुरव, प्रताप घाटगे, डॉ. सतीश पवार, डॉ. कविता जाधव, डॉ. दानेश पोतदार, महेश जोतराव, डॉ. विवेक गुरव, जयंत कराडे उपस्थित होते.
फोटो : ११ तासगाव ३
ओळी : तासगाव येथे फारुक गवंडी यांना प्रा. प. रा. आर्डे, डॉ. बाबुराव गुरव, डॉ. विजय जाधव, वसुधा कराडे-शेटे यांच्या हस्ते कराडे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.