आष्ट्यात भारुडाने स्वच्छतेबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:32 AM2021-02-25T04:32:42+5:302021-02-25T04:32:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या प्रचारासाठी भारूड पथनाट्य तसेच बहुरूपीसारख्या पारंपरिक सांस्कृतिक कलांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या प्रचारासाठी भारूड पथनाट्य तसेच बहुरूपीसारख्या पारंपरिक सांस्कृतिक कलांचा आधार घेऊन शहरामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष स्नेहा माळी, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, विशाल शिंदे, अर्जुन माने, विजय मोरे, प्रतिभा पेटारे यांनी केले. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ तसेच भाजी मंडई यासारख्या ठिकाणी कचरा विलगीकरण तसेच प्लास्टिक न वापरणे तसेच जलबचत, वृक्षारोपण, इत्यादी विषयांवर प्रबोधनात्मक भारूड सादर करण्यात आले.
पारंपरिक कलाप्रकार नागरिकांच्या दृष्टीने समजणेस सोपे तसेच रंजक असल्याने स्थानिक भाषेचा लहेजा सांभाळून भारूड करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये चांगल्या प्रकारे जनजागृती होत आहे; तसेच नागरिकांमध्ये याबद्दल समाधान आहे. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पर्यावरण रक्षणासाठी शपथ घेतली.