समाजात मानवी हक्कांची जाणीव-जागृती होणे आवश्यक : मिलिंद हुजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:42 AM2020-12-12T04:42:05+5:302020-12-12T04:42:05+5:30
हुजरे म्हणाले, भारतीय राज्यघटनेने समाजातील प्रत्येक घटकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण केले आहे. ज्या समाजात असुरक्षित व असंघटित घटकांच्या मानवी ...
हुजरे म्हणाले, भारतीय राज्यघटनेने समाजातील प्रत्येक घटकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण केले आहे. ज्या समाजात असुरक्षित व असंघटित घटकांच्या मानवी हक्कांचे रक्षण होते, तो समाज सुसंस्कारित व प्रगल्भ होतो.
याप्रसंगी प्रा. डी. वाय. साखरे यांनी मानवी हक्क व त्यांचे महत्त्व विशद केले. केंद्र संयोजक प्रा. अण्णासाहेब बागल, तसेच महाविद्यालयातील आदित्य जाधव, अंकित स्वामी, ऋतुजा मोरे, प्रीतम जमदाडे, प्रज्ज्वल पवार,तुषार पवार, श्रेया कांबळे, विघ्नेश वाघमोडे या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रा. जे. ए. यादव यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य डॉ. बी. टी. कणसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नॅक समन्वयक डॉ. एस. एस. पाटील, प्रा. ए. एस. पाचोरे, दिलीप सुवासे, मकरंद पिसाळ व विद्यार्थी उपस्थित होते. डॉॅ. अर्जुन वाघ यांनी सूत्रसंचालन केले.