नको अमली पदार्थांची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा!
By शीतल पाटील | Published: June 26, 2023 06:17 PM2023-06-26T18:17:49+5:302023-06-26T18:18:26+5:30
सांगली : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वाहतूक शाखेतर्फे शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. नको अमली पदार्थांची नशा, आयुष्याची ...
सांगली : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वाहतूक शाखेतर्फे शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. नको अमली पदार्थांची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा, अशा घोषणा देत रॅलीत शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलातर्फे विविध जनाजगृती उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाहतूक शाखेतर्फे रॅली काढण्यात आली. यावेळी अप्पासाहेब बिरनाळे स्कूलच्य विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. नशेखोरीपासून दुर राहण्याचा संदेशही डॉ. तेली दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयापासून रॅलीस सुरूवात झाली. वालचंद महाविद्यालय, आलदर चौक, विश्रामबाग चौक मार्गे पोलिस अधीक्षक कार्यालयात रॅलीचा समारोप झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे घोषणाबाजी दिली. संयोजन शेखर निकम, अल्ताफ हुजरे, नंदु पाटील, सुनील राऊत यांनी केले. तर बिरनाळे स्कूलचे संचालक सागर बिरनाळे, प्रशिक्षक शिवाजी लोखंडे, गणेश हिरमुडे, लता स्वामी यांनी सहकार्य केले.