बाबासाहेब देशमुख बँकेची एक हजार कोटी व्यवसायाकडे झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:25 AM2021-04-13T04:25:03+5:302021-04-13T04:25:03+5:30
फोटो-१२अमरसिंह देशमुख आटपाडी : येथील दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात ६. ७५ कोटी इतका नफा ...
फोटो-१२अमरसिंह देशमुख
आटपाडी : येथील दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात ६. ७५ कोटी इतका नफा झाला आहे. स्पर्धेचे युग, अतिवृष्टी, कोरोना महामारी या सर्व संकटावर मात करीत बँकेने या आर्थिक वर्षात सवोत्तम कामगिरी केल्याचे बँकेचे संस्थापक अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी सांगितले.
ते म्हणाले की बँकेच्या ठेवो ३०६.१२ कोटी, कर्जे २२१.०८ कोटी, भाग भांडवल १४.११ कोटी, गुंतवणूक १०५.८६ कोटी, स्वनिधो २७.५२ कोटी तर ढोबळ नफा ६.७५ कोटी झाला आहे. बँकेचे खेळते भांडवल ३५२.८७ कोटी असून, एकूण व्यवसाय ५२७.२० कोटी झाला आहे. १००० कोटी व्यवसायाकडे बँके झेप घेत आहे. बँकेचा ग्रास एनपीए १.५८ टक्के, नेट एनपीए ०.०० टक्के तर सीआरएआर १३.८७ टक्के आहे. बँकेला सतत ऑडिट वर्ग 'अ' मिळालेला असून, बँकेने दहा शाखांसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा दिली आहे. बँकेचे कार्यक्षेत्र सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्हा असून बँकेला महाराष्ट्र शासनाचा ‘सहकारनिष्ठ पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. बँकेला आतापर्यंत राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बँक, ग्रॉस एनपीए ०.०० टक्के असणारी बँक, कर्तव्यदक्ष सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बँकेचे अध्यक्ष दादासाहेब पाटील, उपाध्यक्ष जयंत देशपांडे, व्यवस्थापकीय संचालक भगवंत पाटील-आडमुठे, बँकेचे सर्व संचालक व बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रम व खातेदारांच्या सहकार्याने बँकेने सर्वोत्तम प्रगती केली आहे.