बहे, साखराळेत विविध विकासकामांचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:23 AM2021-03-22T04:23:45+5:302021-03-22T04:23:45+5:30
बहे (ता. वाळवा) येथे प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते विकासकामांची उद्घाटने करण्यात आली. यावेळी कृष्णराव पाटील, सुवर्णाताई पाटील, छायाताई पाटील, ...
बहे (ता. वाळवा) येथे प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते विकासकामांची उद्घाटने करण्यात आली. यावेळी कृष्णराव पाटील, सुवर्णाताई पाटील, छायाताई पाटील, प्रा.डॉ. सुवर्णाताई पाटील, विठ्ठलराव पाटील, अमोल गुरव, दिनकर पाटील, शशीकांत पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : लोकनेते राजारामबापू पाटील व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाळवा तालुका हे आपले कुटुंब समजून येथील विकासाला आकार दिला आहे. हा विकासाचा रथ गतीने पुढे नेण्याचा माझा प्रयत्न राहील, असा विश्वास युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.
बहे, साखराळे व हुबालवाडी या गावांतील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. साखराळे येथे ५८ लाख रुपये यामध्ये दोन रस्ते, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोर सुशोभीकरण व स्मशानभूमी सोईसुविधा या कामांचा समावेश आहे. बहे येथे बौद्ध विहार, मोहिते व थोरात पाणंद रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन, तर तुकाईखडी रस्ता डांबरीकरण, मुस्लिम स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, मातंग समाजाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोरी दुरुस्ती, मातंग समाज मंदिर, बिरोबा मंदिर परिसर गटरकाम, आदी विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. हुबालवाडी येथे शिंदे व सूर्यवंशी पाणंद रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी विजयबापू पाटील, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, संजय पाटील, विठ्ठलराव पाटील, सुवर्णाताई पाटील, माणिकराव पाटील, बाबूराव हुबाले, रामचंद्र चव्हाण, साखराळेचे सरपंच बाबूराव पाटील, उपसरपंच तजमूल चौगुले, हुबालवाडीचे सरपंच चांगदेव कांबळे, तुकाईखडीच्या सरपंच छायाताई पाटील, उपसरपंच प्रा. डॉ. सौ. सुवर्णा पाटील, आदी उपस्थित होते.