बहिर्जी नाईक स्वराज्याचे महानायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:18 AM2021-07-21T04:18:59+5:302021-07-21T04:18:59+5:30
विटा/खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या लोकांना राज्यव्यवस्थेत सामावून घेतले. छत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीत अनेक हिरे होते. त्यातील एक ...
विटा/खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या लोकांना राज्यव्यवस्थेत सामावून घेतले. छत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीत अनेक हिरे होते. त्यातील एक बहिर्जी नाईक होते. बुद्धिचातुर्य, स्वामीनिष्ठा आणि प्रखर राष्ट्रप्रेम असलेले बहिर्जी आमच्या राजकारणाचा विषय होऊ शकत नाहीत. त्यांचे स्मारक झाले म्हणजे विषय संपत नाही. त्यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे. त्यामुळेच ते स्वराज्याचे महानायक आहेत, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बाणूरगड (ता. खानापूर) येथे फडणवीस यांच्या संकल्पनेतून तयार होणाऱ्या बहिर्जी नाईक यांच्या नियोजित स्मारकाचे भूमिपूजन सोमवारी फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन झाले. यावेळी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर उपस्थित होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, आ. पडळकर यांनी स्मारकाचा आराखडा तयार करून शासनाला सादर केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला. परंतु, ज्यांना जमले नाही ते काम आ. पडळकर यांनी केले. त्यामुळेच ही लढाई प्रस्थापित विरोधी विस्थापित अशी आहे.
आ. पडळकर म्हणाले, हे स्मारक समाजाला नवी दिशा देणारे ठरेल.
जगन्नाथ माळी, प्रमोद शेंडगे, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, मोहन रणदिवे, अरुण बालटे, भूमिका बेरगळ, तानाजी यमगर, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, सुहास पाटील, सरपंच सज्जन बाबर, उपसरपंच कांताबाई गायकवाड, दादासाहेब मरगळे, नेताजी पाटील उपस्थित होते.
फोटो - २००७२०२१-विटा-बाणूरगड : बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन करण्यात आले. यावेळी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ, प्राजक्ता कोरे, शिवाजी डोंगरे, ब्रह्मदेव पडळकर उपस्थित होते.