बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा पर्यटनदृष्ट्या विकास करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:25 AM2021-01-21T04:25:18+5:302021-01-21T04:25:18+5:30
आमदार अनिल बाबर यांनी बुधवारी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले. त्याची तातडीने दखल घेत बाणूरगड ...
आमदार अनिल बाबर यांनी बुधवारी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले. त्याची तातडीने दखल घेत बाणूरगड येथील स्मारक परिसराचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास केला जाईल, असे मंत्री ठाकरे यांनी सांगितले. यासंदर्भात सविस्तर पर्यटन विकास नियोजन करण्यासाठी लागलीच बैठक आयोजित करण्याच्या सूचना ठाकरे यांनी संबंधितांना दिल्या.
ठाकरे म्हणाले, शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्याचपद्धतीने शिवरायांसाठी कार्य करणाऱ्या मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे. नरवीर बहिर्जी नाईक यांनी गुप्तहेरीमधील आपल्या कौशल्याने स्वराज्य स्थापनेत महत्त्वाचे योगदान दिले. त्यांचे कार्य जगासमोर येण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांचे स्मारकस्थळ असलेल्या बाणूरगडचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास केला जाईल.
चाैकट
पारेच्या दरगाेबा मंदिराच्या समावेशाचीही मागणी
यावेळी आमदार अनिल बाबर यांनी पारे (ता. खानापूर) येथील दरगोबा मंदिर परिसराच्या विकासासाठीही पर्यटन योजनेंतर्गत निधी उपलब्ध होण्याबाबत निवेदन सादर केले.