समतोल आहार ही उत्तम यशाची गुरुकिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:44+5:302021-03-09T04:30:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संजयनगर : निरोगी राहा आणि सशक्त बना तसेच समतोल आहार ही उत्तम यशाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : निरोगी राहा आणि सशक्त बना तसेच समतोल आहार ही उत्तम यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा दाते यांनी व्यक्त केले.
सांगलीतील श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयामध्ये मैत्रेयी ग्रुप सांगली व महाविद्यालय माजी विद्यार्थिनी समिती तसेच महिला आरोग्य विकास समिती यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
डॉ. दाते म्हणाल्या की, आज महिलांचे शारीरिक व मानसिक सबलीकरण करणे गरजेचे आहे. इंटरनेटवरील अर्धवट माहितीवर अवलंबून राहण्यापेक्षा वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. पी.आर. पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. एस. के. जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. शोभा पवार यांनी आभार मानले.