झिरो पेमेंट न करणाऱ्या २० व्यापाऱ्यांवर बंदी : जयसिंग जमदाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 04:58 PM2019-11-19T16:58:33+5:302019-11-19T16:59:23+5:30
दिवाळीच्या सुटीनंतर सोमवारी पहिल्यांदाच तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सौद्यांना सुरुवात झाली. सोमवारी तब्बल २८० टन बेदाण्याची आवक झाली; तर २४० टनांची विक्री झाली. गौरीशंकर ट्रेडिंग कंपनी या अडत दुकानात शेतकरी अंकुश रामचंद्र खताळ यांच्या हिरव्या बेदाण्यास उच्चांकी २०१ रुपये इतका किलोला दर मिळाला.
तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा विक्री केलेल्या शेतक-यांचे वेळेत पैसे न देणाºया १२ खरेदीदार व्यापारी आणि ८ अडत व्यापा-यांना बेदाणा खरेदी सौद्यात भाग घेण्यास बंदी आणण्याची कारवाई केली. शेतकºयांचे पैसे २१ दिवसांत न दिल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा सभापती जयसिंग जमदाडे आणि सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला.
शेतक-यांनी विक्री केलेल्या बेदाण्याचे बिल वेळेत देण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. वेळेत बिल न देणाºया व्यापा-यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वेळेत बिल देऊन झिरो पेमेंट न करणाºया २० व्यापा-यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शेतक-यांची देणी भागवल्यानंतर या व्यापाºयांना बेदाणा सौद्यात भाग घेता येणार असल्याचे सभापती जमदाडे यांनी सांगितले.
खरेदीदार व्यापा-यांनी अडत्यांना तातडीने पेमेंट पूर्ण करावे, अडत्यांनी शेतक-यांचे पट्टी पेमेंट २१ ते २३ दिवसांत पूर्ण करावे व खरेदीदार व्यापाºयांनी अडत्यांचे पेमेंट ३५ ते ४० दिवसांत पूर्ण करावे. याची तपासणी बाजार समिती स्वत: वेळोवेळी करणार आहे.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी झालेल्या सौद्यात २८० टन बेदाण्याची आवक झाली. त्यापैकी २४० टन बेदाण्याची विक्री झाली. बेदाणा दरात सरासरीपेक्षा १० ते १५ रुपयांची वाढ झाल्याची माहिती सभापती जयसिंग जमदाडे व सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
दिवाळीच्या सुटीनंतर सोमवारी पहिल्यांदाच तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सौद्यांना सुरुवात झाली. सोमवारी तब्बल २८० टन बेदाण्याची आवक झाली; तर २४० टनांची विक्री झाली. गौरीशंकर ट्रेडिंग कंपनी या अडत दुकानात शेतकरी अंकुश रामचंद्र खताळ यांच्या हिरव्या बेदाण्यास उच्चांकी २०१ रुपये इतका किलोला दर मिळाला. बेदाणा दरात सरासरी दहा ते पंधरा रुपयांची दरवाढ झाल्याची माहिती सभापती जमदाडे यांनी दिली.
हिरवा बेदाणा १२५ ते २०१ रुपये किलोला दर मिळाला. सरासरी दर १३५ ते १६५ रुपये राहिला. पिवळा बेदाणा १२० ते १७० रुपये, तर सरासरी दर १२५ ते १५५ रुपये मिळाला. काळ्या बेदाण्यास सरासरी दर ६० ते ८० रुपये मिळाला. बेदाण्याला चांगला दर मिळण्यासाठी उत्पादक शेतकºयांनी बाजार समिती आवारातच विक्री करावी, असे आवाहन जमदाडे आणि सूर्यवंशी यांनी केले.