क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीत निवडणुकीच्या जेवणावळीवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 11:11 PM2017-10-07T23:11:41+5:302017-10-07T23:11:57+5:30

प्रतिसरकारचे शिलेदार क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असणाºया येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील युवक व तंटामुक्त समितीने निवडणुकीच्या जेवणावळींवर बंदी घातली आहे.

Ban on election dinners in the birthplace of Krantisinh | क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीत निवडणुकीच्या जेवणावळीवर बंदी

क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीत निवडणुकीच्या जेवणावळीवर बंदी

Next

- निवास पवार

शिरटे (जि. सांगली) : प्रतिसरकारचे शिलेदार क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असणाºया येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील युवक व तंटामुक्त समितीने निवडणुकीच्या जेवणावळींवर बंदी घातली आहे. निवडणूक लढविणाºया उमेदवाराने गावात किंवा बाहेर कोठेही जेवणावळ घातली तर त्याला ५० हजार रुपये दंड करण्याचा निर्णय जाहीर केला
आहे.
येडेमच्छिंद्र हे सहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात नाना पाटील यांचे स्मारकही आहे. येथे सरपंचपदासाठी दुरंगी, तर सदस्यपदासाठी तिरंगी लढत होत आहे. सत्ताधारी जयंत क्रांती ग्रामविकास पॅनेल, जोतिर्लिंग ग्रामविकास पॅनेल व क्रांतिसिंह नाना पाटील ग्रामसुधार युवक पॅनेलमध्ये तिरंगी लढत होत आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीत रंग येऊ लागला आहे.
जेवणावळी कशा होणार, कोठे होणार, कोणता उमेदवार कोणत्या धाब्यावर जेवण देणार, अशी चर्चा सुरू असतानाच, युवकांनी एकत्र येत जेवणावळीवर बंदी घालण्याबाबत तंटामुक्त समितीशी चर्चा केली. युवकांच्या या निर्णयाचे स्वागत करीत तंटामुक्त समितीनेही त्याला दुजोरा दिला. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. अ‍ॅड. संग्राम पाटील, शरद पाटील (नांगरे) व संजय पाटील यांनी पॅनेलप्रमुख या नात्याने झालेल्या ठरावावर सह्या केल्या.

Web Title: Ban on election dinners in the birthplace of Krantisinh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.