नाग पकडण्यासही बंदी
By Admin | Published: July 16, 2014 01:32 AM2014-07-16T01:32:21+5:302014-07-16T01:32:38+5:30
शेकडो वर्षांची परंपरा
नाग पकडण्यासही बंदी या सणाबाबत उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर आज देण्यात आलेला निकाल शिराळकरांना धक्कादायक आहे. याबाबत वरिष्ठ वकिलांबरोबर चर्चा करून त्वरित सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळण्यासाठी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून येथील नागरिक रुढी, परंपरेनुसार नागपंचमी साजरी करतील. - मानसिंगराव नाईक, आमदार नागपंचमीविषयी उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत वकिलांबरोबर चर्चा करून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न करू. येथील रुढी, परंपरेनुसार नागपंचमी साजरी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात नागरिकांच्या भावनांनुसार अनुकूल निर्णय मिळविण्यासाठी प्रयत्न करू. - सत्यजित देशमुख, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस येथील नागपंचमीस शेकडो वर्षांची परंपरा आहे. न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर गेली काही वर्षे न्यायालयाचा मान राखून शासकीय समितीच्या देखरेखीखाली नागपंचमी साजरी होत आहे. आजच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न करू, तसेच नागपंचमी कालावधीत वन्यजीव कायदा शिथिल करण्याबाबत कायद्यात तरतूद करण्यासाठी लोकसभेमध्ये प्रयत्न करू. - शिवाजीराव नाईक, माजी आमदार