गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉल्बी सिस्टीमला मनाई, आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:45 PM2019-08-31T12:45:29+5:302019-08-31T12:48:52+5:30

सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याही डॉल्बी मालक / धारक गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांच्या कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपभोगात आणू नये असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

A ban on the use of Dolby system was issued in the wake of Ganeshotsav | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉल्बी सिस्टीमला मनाई, आदेश जारी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉल्बी सिस्टीमला मनाई, आदेश जारी

googlenewsNext
ठळक मुद्देगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉल्बी सिस्टीमला मनाई आदेश जारी, फौजदारी कारवाई करण्याचा इशारा

सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याही डॉल्बी मालक / धारक गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांच्या कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपभोगात आणू नये असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सन 1973 च्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144(1) अन्वये सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 15 सप्टेंबर 2019 रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याही डॉल्बी मालक / धारक गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांच्या कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपभोगात आणू नये असे आदेश डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

डॉल्बी मशीन व यंत्रसामुग्री स्वत:च्या कब्जात सीलबंद स्थितीत ठेवावी. उच्च न्यायालय मुंबई यांनी ध्वनी प्रदूषणाबाबत वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असे आदेश दिले आहेत.

हा आदेश दिनांक 1 सप्टेंबर 2019 रोजीचे 01.00 वाजल्यापासून ते दिनांक 15 सप्टेंबर 2019 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती / मंडळाचे पदाधिकारी यांच्या विरूध्द पोलीस विभागाकडून फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
 

Web Title: A ban on the use of Dolby system was issued in the wake of Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.