आता लग्नात वाजणार बॅन्ड व बॅन्जाे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:27 AM2020-12-06T04:27:51+5:302020-12-06T04:27:51+5:30
बोरगाव : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर विवाह साेहळ्यांसह बॅन्ड व बॅन्जाे बंद असल्याने कलाकारांची आर्थिक काेंडी झाली हाेती. या पार्श्वभूमीवर कलाकार ...
बोरगाव : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर विवाह साेहळ्यांसह बॅन्ड व बॅन्जाे बंद असल्याने कलाकारांची आर्थिक काेंडी झाली हाेती. या पार्श्वभूमीवर कलाकार महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष अनिल मोरे व सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज घाडगे यांनी लाॅकडाऊनच्या काळात बंद असलेले बॅन्ड बॅन्जो व इतर करमणूक कार्यक्रमांना मान्यता द्यावी, यासाठी पाठपुरावा चालविला हाेता. त्यास यश येऊन नुकतेच प्रशासनाने बॅन्ड व बॅन्जाेसह करमणुकीच्या कार्यक्रमांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन परवानगी दिली आहे.
उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनी कलाकारांना कार्यक्रमांसाठी मान्यता देत आसल्याचे एक पत्र जाहीर केल्यामुळे यापुढे लग्न व सार्वजनिक कार्यक्रमांत करमणूक कलाकार, डाॅल्बी बॅन्जो-बॅन्ड वाजणार आहेत, अशी माहिती सांगली जिल्हा कलाकार संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज घाडगे यांनी दिली. या निर्णयाबद्दल महासंघाच्यावतीने जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम, उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांचे आभार मानण्यात आले. यावेळी राज्य सरचिटणीस रमेश होनवार, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नंदकुमार आयवाळे, सांगली जिल्हा कोषाध्यक्ष रियाज मुल्ला, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष उमेश अवघडे, वाळवा तालुका उपाध्यक्ष शरद सुर्वे, मिरज तालुका अध्यक्ष विजय जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.