बंगळूरूच्या शार्प शूटरला मिरजेत अटक, खुनाची सुपारी, शस्त्रे खरेदीसाठी आल्यानंतर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 01:23 PM2017-12-12T13:23:26+5:302017-12-12T16:09:55+5:30

बंगळूरूमध्ये एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या खुनाची ह्यसुपारीह्ण घेतल्यानंतर, मिरजेत शस्त्रे खरेदीसाठी आलेल्या एका शार्प शूटरला बंगळूरू पोलिसांनी थरारक पाठलाग करुन पकडले. विजू बाडगीर असे त्याचे नाव आहे. मिरज-म्हैसाळ रस्त्यावर सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

Bangalore Sharp shooter found arrested in Mirzag, murderer betel nut and weapons after purchasing | बंगळूरूच्या शार्प शूटरला मिरजेत अटक, खुनाची सुपारी, शस्त्रे खरेदीसाठी आल्यानंतर सापडला

बंगळूरूच्या शार्प शूटरला मिरजेत अटक, खुनाची सुपारी, शस्त्रे खरेदीसाठी आल्यानंतर सापडला

Next
ठळक मुद्देपोलिसांनी थरारक पाठलाग करुन पकडले. मिरज-म्हैसाळ रस्त्यावर कारवाई

सांगली : बंगळूरूमध्ये एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या खुनाची सुपारी घेतल्यानंतर, मिरजेत शस्त्रे खरेदीसाठी आलेल्या एका शार्प शूटरला बंगळूरू पोलिसांनी थरारक पाठलाग करुन पकडले. विजू बाडगीर असे त्याचे नाव आहे. मिरज-म्हैसाळ रस्त्यावर सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.


विजू बाडगीर हा बंगळूरू पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारीसह गंभीर गुन्हे नोंद आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने बंगळूरूमध्ये एका प्रतिष्ठीत व्यक्तीचा खून करण्यासाठी सुपारी घेतली आहे. यासाठी त्याला शस्त्रे लागणार असल्याने तो सोमवारी मिरजेत येणार होता.

बंगळूरू पोलिसांना याची माहिती मिळाल्याने ते बंगळूरूपासून त्याच्या मागावर होते. अखेर त्याला मिरज-म्हैसाळ रस्त्यावर पकडण्यात यश आले. पोलिस कारवाईची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांना त्याने धक्काबुक्कीही केली. त्याची झडती घेतली. पण त्याच्याकडे कोणतेही शस्त्र सापडले नाही. या कारवाईची मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करुन रात्री उशिरा पोलिसांचे पथक बंगळूरूला रवाना झाले.

 

Web Title: Bangalore Sharp shooter found arrested in Mirzag, murderer betel nut and weapons after purchasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.