बॅँक कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोरोनाची लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:26 AM2021-03-18T04:26:27+5:302021-03-18T04:26:27+5:30
विटा : कोरोनाकाळात महसूल प्रशासन, पोेलीस, शिक्षण, आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे अत्यावश्यक सेवा म्हणून बॅँक कर्मचाऱ्यांनीही स्वत:चा जीव धोक्यात घालून आपले ...
विटा : कोरोनाकाळात महसूल प्रशासन, पोेलीस, शिक्षण, आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे अत्यावश्यक सेवा म्हणून बॅँक कर्मचाऱ्यांनीही स्वत:चा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले आहे. परंतु, कोरोना लस देताना बॅँक कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने का विचार झाला नाही, असा सवाल करून बॅँक कर्मचाऱ्यांनाही प्राधान्याने लस देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती शिवप्रताप मल्टीस्टेट सोसायटीचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी दिली.
विठ्ठलराव साळुंखे म्हणाले, मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून सलग सहा महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार सुरळीत राहावेत, यासाठी बॅँक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा दिली आहे. काही वेळा सुरक्षा किटचा वापर करून कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना घरपोच सेवा देऊन अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
मात्र, सध्या सर्वांना कोरोना लस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, लसीकरणासाठी बॅँक कर्मचाऱ्यांचा सोयीस्कररीत्या विसर पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बॅँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्राधान्याने मोफत लस उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी सांगितले.
फोटो - १७०३२०२१-विटा-विठ्ठलराव साळुंखे. यांचा फोटो वापरणे.