कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:28 AM2021-03-23T04:28:03+5:302021-03-23T04:28:03+5:30
सांगली : जिल्ह्यात साडेतीनशे कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाल्याने आता शेतकऱ्यांवर बँका मेहरबान झाल्या असून, जिल्ह्यात डिसेंबरअखेर उद्दिष्टापैकी ६० टक्के ...
सांगली : जिल्ह्यात साडेतीनशे कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाल्याने आता शेतकऱ्यांवर बँका मेहरबान झाल्या असून, जिल्ह्यात डिसेंबरअखेर उद्दिष्टापैकी ६० टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शिवारात पुन्हा बहर फुलणार आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक कर्जमाफी जिल्हा बँकेने दिली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्जवाटपाचे प्रमाण कमी असल्याने त्यांची कर्जमाफीही कमी आहे. तरीही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने अशा शेतकऱ्यांना मुक्त हस्ते कर्जवाटप करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी कर्जमाफीसाठी पात्र असूनही लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास अडथळे आले होते. तेही दूर झाले आहेत.
चाैकट
पीक कर्जाची आकडेवारी आकडे कोटीत
वर्ष उद्दिष्ट वाटप टक्के
२०१६-१७ १८२० १८४३ १०१
२०१७-१८ २०३० १३६० ६७
२०१८-१९ २१०० १४५८ ६९
२०१९-२० २४१७ १३७३ ५७
२०२०-२१ २५९५ १५६३ ६० (डिसेंबर २०२० पर्यंत)
कोट
जिल्ह्यात सध्या पीक कर्जवाटपाचे प्रमाण चांगले आहे. डिसेंबरपर्यंत ६० टक्के उद्दिष्टपूर्ती झाली असून, मार्चअखेर शंभर टक्के होण्याची शक्यता आहे.
डी. व्ही. जाधव, मुख्य प्रबंधक, अग्रणी बँक सांगली
कोट
कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर लगेचच नव्या पिकासाठी प्रस्ताव दिल्यानंतर कर्ज मंजूर झाले. पूर्वीच्या याेजनेपेक्षा ही योजना सुलभ होती. त्यामुळे मोठ्या आर्थिक संकटातून दिलासा मिळाला आहे.
-नितीन पाटील, इस्लामपूर
कोट
कर्जमाफी आम्हाला मिळाली नाही. तांत्रिक कोणत्या कारणात्सव कर्जमाफी मिळाली नाही, हे कळाले नाही. त्यामुळे नव्या कर्जासाठी अर्जही केला नाही.
-मधुकर देसाई, सावळज
मिळालेली कर्जमाफी जिल्हा बँकेकडील
६२,६५५ शेतकरी
कर्जमाफी ३४१ कोटी १४ लाख ६६ हजार