घरपट्टी थकबाकीदारांसमोर आता वाजंत्री

By admin | Published: January 21, 2015 12:20 AM2015-01-21T00:20:29+5:302015-01-21T00:20:43+5:30

महापालिकेचा वसुलीसाठी निर्णय : पाणी कनेक्शन तोडण्याचा इशारा

Bastric scarcity in front of moneylenders | घरपट्टी थकबाकीदारांसमोर आता वाजंत्री

घरपट्टी थकबाकीदारांसमोर आता वाजंत्री

Next

सांगली : महापालिकेने शहरातील घरपट्टी थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आता मालमत्ताधारकांच्या घरासमोर वाजंत्री वाजवून थकबाकीची वसुली केली जाणार आहे. तसेच दहा हजारापेक्षा जादा थकबाकी असलेल्यांचे पाणी कनेक्शन तोडण्याची कार्यवाहीही हाती घेतली जाणार आहे. महापालिका क्षेत्रात एक लाख सहा हजार मालमत्ताधारक आहेत. गेल्या काही वर्षांपासून घरपट्टीच्या थकबाकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सध्या थकबाकी सुमारे २५ कोटीच्या घरात असून चालू मागणीही तितकीच म्हणजे २५ कोटींच्या आसपास आहे. त्यात ‘एचसीएल’ बंद पडल्याने यंदा घरपट्टीची बिले वेळेवर पोहोच करण्यात पालिकेला कसरत करावी लागली. घरपट्टी विभागाचा स्वतंत्र कार्यभार सुनील नाईक यांच्याकडे सोपविण्यानंतर वसुलीत वाढ झाली आहे. महिन्याभरात चालू व मागील घरपट्टी वसुलीसाठी नाईक यांनी विशेष प्रयत्न केले. आता पालिकेने आणखी कठोर पावले उचलली आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात पन्नास हजारापेक्षा जादा थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची नावे वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जाणार आहेत. तसेच दहा हजारावरील मालमत्ताधारकांचे पाण्याचे कनेक्शन तोडले जाणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. थकबाकी असणाऱ्यांच्या मिळकतीसमोर वाजंत्री वाजवून थकबाकीची रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला असून, मालमत्ताधारकांची मानहानी झाल्यास त्याला पालिका जबाबदार राहणार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Bastric scarcity in front of moneylenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.