कडेगावात रंगणार दिग्गजांची लढाई

By admin | Published: October 30, 2016 11:28 PM2016-10-30T23:28:25+5:302016-10-30T23:28:25+5:30

काँग्रेस-भाजप आमने-सामने : शिवसेना; अपक्षही रिंगणात

Battle of Giants to be held in Kathgama | कडेगावात रंगणार दिग्गजांची लढाई

कडेगावात रंगणार दिग्गजांची लढाई

Next

कडेगाव : कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत कॉँग्रेस आणि भाजपमधील काही दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. ही निवडणूक या दिग्गज उमेदवारांच्या प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. येथे कॉँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य सामना रंगणार असला तरी, अपक्ष आणि शिवसेनेच्या काही उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
कडेगाव ग्रामपंचायतीचे नागरपंचायतीत रूपांतर झाले आणि यानंतर आता कडेगाव नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. येथे कॉँग्रेस आणि भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरले. यामध्ये कॉँग्रेसकडून कडेगावचे माजी सरपंच प्रशांत ऊर्फ राजू जाधव यांनी प्रभाग क्र. १६ मधून उमेदवारी अर्ज भरला आहे. राजू जाधव सरपंच असताना कडेगाव नगरपंचायतीची घोषणा झाली. यामुळे त्यांना फक्त ७ महिने सरपंचपदी संधी मिळाली होती़. मागील पंचवार्षिकमध्ये सरपंचपद भूषविलेले विजय शिंदे यांनी प्रभाग क्र. १७ मधून कॉँग्रेसच्या चिन्हावर अर्ज दाखल केला आहे. याशिवाय कडेगावचे माजी उपसरपंच अविनाश जाधव यांच्या पत्नी आकांक्षा जाधव यांनी प्रभाग क्र. ९ मधून कॉँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. याशिवाय सागरेश्वर सूतगिरणीचे माजी अध्यक्ष गुलाम पटेल यांचे चिरंजीव साजिद पटेल यांनी प्रभाग क्र. ४ मधून कॉँग्रेसकडून अर्ज भरला आहे.
येथील नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. यामुळे या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागात काँग्रेस आणि भाजप दोन्हीकडून तुल्यबळ महिला उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. विशेषत: खुल्या प्रवर्गातील तसेच दिग्गज उमेदवार असलेल्या प्रभागात लक्षवेधी लढती होणार असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासाठी कडेगावची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. (वार्ताहर)
तुल्यबळ उमेदवार
भाजपकडून युवा नेते उदयसिंह देशमुख यांनी प्रभाग क्र. ७ मधून अर्ज भरला आहे. भाजपनेही तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. दोन्हीकडून सर्व १७ जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत. आता उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Battle of Giants to be held in Kathgama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.