कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:35+5:302021-05-29T04:21:35+5:30

कवठेमहांकाळ : कोरोनाच्या महामारीत शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क घेऊ नये. तसेच घेतलेले शुल्क परत द्यावे, अशा मागणीचे ...

Because of the corona, schools and colleges should not charge students | कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊ नये

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊ नये

googlenewsNext

कवठेमहांकाळ : कोरोनाच्या महामारीत शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क घेऊ नये. तसेच घेतलेले शुल्क परत द्यावे, अशा मागणीचे निवेदन कवठेमहांकाळ तहसीलदारांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे देण्यात आले.

या निवेदनात म्हटले की, गेली दीड वर्ष झाली कोरोनाची महामारी सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शैक्षणिक शुल्क भरण्यास विद्यार्थी असमर्थ आहेत. तरीही शैक्षणिक संस्था सक्तीची शुल्क वसुली करीत आहेत. ती शुल्क वसुली थांबवावी. तसेच काही शाळा, महाविद्यालयाने घेतलेले शुल्क परत करावे, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सौरभ ओलेकर यांनी दिला आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष सोमनाथ टोणे, जिल्हा सरचिटणीस सागर सपकाळ, बालाजी पवार, अनिकेत ओलेकर, महेश झुरे, आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Because of the corona, schools and colleges should not charge students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.