ऐतवडे खुर्दमध्ये यात्रेत भाविकांवर मधमाशांचा हल्ला, शेकडो भाविक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 03:38 PM2022-04-21T15:38:12+5:302022-04-21T15:38:32+5:30

मधमाशांच्या भीतीने अनेकांची तारांबळ उडाली.

Bee attack on devotees on pilgrimage in Aitwade Khurd sangli district | ऐतवडे खुर्दमध्ये यात्रेत भाविकांवर मधमाशांचा हल्ला, शेकडो भाविक जखमी

ऐतवडे खुर्दमध्ये यात्रेत भाविकांवर मधमाशांचा हल्ला, शेकडो भाविक जखमी

googlenewsNext

कुरळप : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेत आज, गुरुवारी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला. यात शेकडो भाविक जखमी झाले असून मधमाशांच्या भीतीने अनेकांची तारांबळ उडाली.

ग्रामदैवत भैरवनाथ देवालयाच्या शेजारी शेकडो वर्षांपूर्वीचे वडाचे व गोरख चिंचेचे भलेमोठे वृक्ष आहे. या झाडावर विविध प्रकारच्या पक्ष्यांसह वानरांचे वास्तव्य असते. याच वटवृक्षावर मधमाशांच्या पोळ्याचे वास्तव्य होते. दोन दिवसांपूर्वीच भैरी सशाच्या हल्ल्यात मधमाशांचा उठाव झाला. त्यावेळीही मंदिरासमोरून ये-जा करणाऱ्या अनेक भाविकांवरही माशांनी हल्ला केला होता. त्यात अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर मधमाशा अचानक निघून गेल्या.

 

Web Title: Bee attack on devotees on pilgrimage in Aitwade Khurd sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली