नांगोळे येथे ओढ्यातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:48+5:302021-03-19T04:25:48+5:30
नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथे ओढ्याच्या रुंदीकरण व खोलीकरण कामाला तहसीलदार बी.जी. गोरे यांच्या हस्ते सुरुवात झाली. या वेळी अंकुश ...
नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथे ओढ्याच्या रुंदीकरण व खोलीकरण कामाला तहसीलदार बी.जी. गोरे यांच्या हस्ते सुरुवात झाली. या वेळी अंकुश नारायणकर, सागर साळुंखे, बालाजी चव्हाण, तलाठी अर्जुन ताटे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : जलबिरादरीतर्फे नांगोळे येथे ओढ्यातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. अग्रणी नदी खोरे पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत नांगोळेमध्ये जानेवारीपासून मृदा व जलसंधारणाची कामे सुरू आहेत. वनजमिनीवर चरी, मातीनाला बांध, ओढा खोलीकरण व रुंदीकरण, शेतकऱ्यांना केशर आंबा रोपांचे वाटप, ओढ्यांच्या काठांवर बांबू लागवड, वृक्षारोपण, मियावाकी वनराई अशी कामे सुरू आहेत. गुरुवारी (दि. १८) तहसीलदार बी.जी. गोरे यांच्या हस्ते कुंभार तलावापासून नांगोळेपर्यंत ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
या वेळी मंडलाधिकारी गब्बरसिंह गारळे, जलबिरादरीचे जिल्हा समन्वयक अंकुश नारायणकर, सागर साळुंखे, बालाजी चव्हाण, तलाठी अर्जुन ताटे, उपसरपंच वसंत हुबाले, अमोल कोळेकर, अनिल गोंधळे, सुनील फोंडे आदी उपस्थित होते.