बेळंकी येथे तब्बल महिनाभर विहिरीत अडकून पडलेल्या घोणस सापाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 12:20 PM2021-05-29T12:20:02+5:302021-05-29T12:29:12+5:30

Wildlife Sangli : बेळंकी (ता. मिरज ) येथे तब्बल महिनाभर विहिरीत अडकून पडलेल्या घोणस सापाला ॲनिमल राहतच्या कार्यकर्त्यांनी जीवदान दिले. प्रमोद कोथळे यांच्या विहरीत तो पडला होता. संरक्षक कठडा नसल्याने तो विहिरीत पडला असावा.

At Belanki, a life-threatening snake was trapped in a well for a month | बेळंकी येथे तब्बल महिनाभर विहिरीत अडकून पडलेल्या घोणस सापाला जीवदान

बेळंकी येथे तब्बल महिनाभर विहिरीत अडकून पडलेल्या घोणस सापाला जीवदान

googlenewsNext
ठळक मुद्दे विहिरीत अडकून पडलेल्या घोणस सापाला जीवदानबेळंकी येथे विहिरीत तब्बल महिनाभर अडकून पडला

सांगली : बेळंकी (ता. मिरज ) येथे तब्बल महिनाभर विहिरीत अडकून पडलेल्या घोणस सापाला ॲनिमल राहतच्या कार्यकर्त्यांनी जीवदान दिले. प्रमोद कोथळे यांच्या विहरीत तो पडला होता. संरक्षक कठडा नसल्याने तो विहिरीत पडला असावा.

कोथळे यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना शक्य झाले नाही. शिवाय तो अतिविषारी असल्यानेही बाहेर काढणे धोक्याचे होते. ॲनिमल राहतच्या कौस्तुभ पोळ, किरण नाईक, प्रसाद सूर्यवंशी यांनी साठ फूट खोल अडकलेल्या घोणस सापाला यशस्वीरित्या बाहेर काढले.

दमलेल्या अवस्थेत तो पाण्याकडेला दगडावर बसलेला आढळला. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या नव्हत्या, त्यामुळे दोरीवरुन उतरुन सापाची सुटका केली. तपासणी करुन निसर्गात मुक्त केले.

Web Title: At Belanki, a life-threatening snake was trapped in a well for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.