जिल्ह्यातील १३७६ शाळांची वाजली घंटा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:32 AM2021-09-07T04:32:37+5:302021-09-07T04:32:37+5:30

सांगली : जिल्ह्यात जिल्हा परिषद, खासगी पहिली ते बारावीपर्यंतच्या २९४६ शाळा असून, त्यापैकी सोमवारपर्यंत १३७६ शाळांची घंटा वाजली आहे. ...

The bells of 1376 schools in the district ... | जिल्ह्यातील १३७६ शाळांची वाजली घंटा...

जिल्ह्यातील १३७६ शाळांची वाजली घंटा...

Next

सांगली : जिल्ह्यात जिल्हा परिषद, खासगी पहिली ते बारावीपर्यंतच्या २९४६ शाळा असून, त्यापैकी सोमवारपर्यंत १३७६ शाळांची घंटा वाजली आहे. एकूण ८३ हजार ७९९ विद्यार्थी दाखल झाले आहेत. उर्वरित शाळा येत्या आठवड्याभरात सुरू होतील, असा दावा जिल्हा परिषदेने केला आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १७७४ शाळा असून, त्यापैकी १०२६ शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांची ८२ हजार ९२८ पटसंख्या आहे. यापैकी ३७ हजार ६४ विद्यार्थी शाळेत उपस्थित आहेत. खासगी प्राथमिकच्या ४६० शाळांपैकी ७२ शाळा सुरु झाल्या असून, ७५५० विद्यार्थी हजर आहेत. खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या ७१२ शाळा असून २८७ शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळेत पाचवी ते बारावीचे ३९ हजार १८५ विद्यार्थी हजर झाले आहेत.

चौकट

महापालिका क्षेत्रात केवळ सहा शाळा सुरू

ग्रामीण भागामध्ये शाळा, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये ८० टक्के सुरू झाली आहेत. महापालिका क्षेत्रात प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या २९८ असून, त्यापैकी केवळ सहाच शाळा चालू आहेत. कडेगाव, मिरज तालुक्यातील शाळाही फारशा सुरू नाहीत. शिराळा, वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, पलूस तालुक्यांमध्ये चांगला प्रतिसाद आहे.

चौकट

पहिली ते बारावीच्या सुरू झालेल्या शाळा

तालुका सुरू झालेल्या शाळा उपस्थित विद्यार्थी संख्या

शिराळा २०४ १०२५३

वाळवा २६३ १२४१७

मिरज ५१ ४३००

तासगाव १९७ १६३५१

पलूस ९५ १२०९५

कडेगाव ३७ १५०९

खानापूर १०५ ३६४३

आटपाडी ७६ ४१७९

क.महांकाळ १२७ ७९३६

जत २१५ ९७९९

महापालिका क्षेत्र ६ १३१७

एकूण १३७६ ८३७९९

कोट

जिल्ह्यातील सर्व शाळांना कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारपर्यंत ५० टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्यात सर्व शाळा सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठीच शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

-विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी

Web Title: The bells of 1376 schools in the district ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.