बेळोंडगीत शेेतकरी दोन वर्षांपासून शासकीय योजनापासूून वंचित...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:00+5:302021-05-06T04:27:00+5:30
संख : बेळोंडगी (ता. जत) येथे कृषी सहायक गावात येत नाहीत. बेपत्ता आहेत. दररोज उपस्थित राहण्याचा नियम असताना तालुक्यातून ...
संख : बेळोंडगी (ता. जत) येथे कृषी सहायक गावात येत नाहीत. बेपत्ता आहेत. दररोज उपस्थित राहण्याचा नियम असताना तालुक्यातून कारभार सुरू आहे. जतमध्येच समांतर कार्यालये खोलली आहेत. गावातील शेेतकरी दोन वर्षांपासून शासकीय योजनापासूून वंचित आहेत. याबाबत शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
पूर्व भागातील बेळोंडगी तालुक्यापासून ६० किलाेमीटर अंतरावर आहे. उमदी कृषी मंडलात गावाचा सामावेश आहे. गावात द्राक्ष, डाळिंब फळबागांचे प्रमाण अधिक आहे. कृषी सहायक म्हणून कोटी कार्यरत आहेत. शेततलाव, पांडुरंग फुंडकर फळबाग योजना, ताडपत्री, शासकीय योजनांची माहिती, लाभार्थींची यादी तयार करणे आदी कामे कृषी विभागाची आहेत.
कृषी सहायक गावात येत नसल्याने कामे खोळंबून राहिली आहेत. 'कृषी सहायक दाखवा, हजार रुपये मिळावा’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कृषी सहायकांच्या हलगर्जीमुळे गावाला पाडुरंग फुंडकर फळबाग योजना, ताडपत्री, शेततलाव योजनेसह इतर योजनांचा कोणताही लाभ दोन वर्षांत मिळालेला नाही. शासकीय लाभापासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पिकांची, हंगामाची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर कोणत्याही उपाययोजना करायला पाहिजेत. याची योग्य माहिती मिळत नाही. तसेच फळबाग विमा योजनेचाही लाभ मिळालेला नाही. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुुुकसान होत आहे.
याबाबत कृषी विभागाकडे तक्रार करूनसुद्धा दुर्लक्ष करण्यात आले आहे. तालुका कृषी विभाग पाठीशी घातला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे.
याकडे कृषी अधिकारी यांनी लक्ष देऊन कायमस्वरूपी कृषी अधिकारी यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
चाैकट
गावातच वास्तव्य बंधनकारक
कृषी सहायकाने नेमणुकीच्या गावातच वास्तव्य करण्याचा नियम आहे. हा नियम पायदळी तुडवत तालुक्यात वास्तव्य करून कारभार चालवत आहेत. गावातील पीकपाणी, दुष्काळी परिस्थितीची खरी माहिती समजत नाही. शेतकऱ्यांना कामासाठी जतला जावे लागते. नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
काेट
कृषी सहायक गावात येत नसल्याने पिकांवर रोगांचा प्रार्दुभाव झाल्यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. शासकीय लाभापासून वंचित रहावे लागत आहे. दुष्काळाबरोबरच शासकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीने नुकसान होत आहे. कृषी सहायक गावात दररोज येण्याची व्यवस्था करण्यात यावी.
- सोमनिंग बोरामणी
अध्यक्ष,
विकास सर्व सेवा सहकारी सोसायटी, बेळोंडगी.