संजय गांधी निराधार योजनेचा १०३ लाभार्थ्यांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:18 AM2021-07-08T04:18:26+5:302021-07-08T04:18:26+5:30
सांगली : शहरातील संजय गांधी निराधार योजनेच्या निकषात बसणाऱ्या १०३ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. या सर्व लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे ...
सांगली : शहरातील संजय गांधी निराधार योजनेच्या निकषात बसणाऱ्या १०३ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. या सर्व लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप अध्यक्षा ज्योती आदाटे यांच्याहस्ते करण्यात आले. समिती स्थापन होऊन आठ महिन्यांत ४०० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. विधवा, परित्यक्ता, घटस्फ़ोटिता, प्रौढकुमारिका, दिव्यांग, वृध्द, निराधार, दुर्धर, आजारी, कमी उंची असलेल्या लोकांचा या लाभार्थ्यांत समावेश होता.
कोरोनामुळे अनेक कुटुंबे अडचणीत आली असून, त्यांना रोजीरोटीसाठीही संघर्ष करावा लागत आहे. अनेक महिलांना वैधव्य आले आहे. अनेक वृध्द निराधार झाले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तात्काळ प्रकरण मंजूर करून त्यांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित असतील, त्यांनी तातडीने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदाटे यांनी केले आहे.