‘ई-ट्रेडिंग’चा शेतकऱ्यांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:06 AM2018-04-30T00:06:44+5:302018-04-30T00:06:44+5:30
सांगली : विदर्भातही बाजार समित्या कार्यरत असल्या तरी, त्यांची उलाढाल सांगली बाजार समितीएवढी नाही. शेतकºयांच्या विश्वासामुळेच येथील व्यवहार वाढत आहेत. त्यात शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ई-ट्रेडिंग व ई-पेमेंट प्रणालीमुळे कृषी क्षेत्रातील व्यवहारात पारदर्शकता आली आहे. ही प्रणाली प्रभावीपणे कार्यरत असल्याने शेतकºयांना याचा फायदा होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रविवारी येथे केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सहकार भवनमध्ये आयोजित सत्कार समारंभात अहिर बोलत होते. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. मोहनराव कदम, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
अहिर पुढे म्हणाले की, काळाच्या बरोबर बदलण्यासाठी व शेतकºयांचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. शासनाच्या ई-ट्रेडिंग, ई-पेमेंट यासारख्या पारदर्शी योजना राबविल्या जात आहेत. यामुळे थेट लाभ शेतकºयांना होत आहे.
सांगली बाजार समितीच्या उलाढालीबद्दल आश्चर्य व्यक्त करत ते म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीचा वार्षिक नफा १८ कोटींचा व ठेवी ४५ कोटींच्या आहेत. ही गोष्ट कृषी क्षेत्रासाठी आश्वासक आहे. विदर्भात बाजार समित्यांचे जाळे असताना एकही बाजार समिती सांगलीएवढी सक्षम नाही.
खा. संजयकाका पाटील म्हणाले की, सांगली बाजार समिती हळद, बेदाणा व गुळासाठी देशभर प्रसिध्द आहे. हा लौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बाजार समितीत सचिव प्रकाश पाटील यांचे योगदान आहे. निवृत्तीनंतरही त्यांच्या अनुभवाचा फायदा बाजार समितीला होईल.
राज्यमंत्री अहिर यांच्याहस्ते सचिव प्रकाश पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी विक्रम सावंत, दीपक शिंदे-म्हैसाळकर, तानाजी पाटील, जीवन पाटील, दादासाहेब कोळेकर, सुभाष खोत, दीपक शिंदे, कुमार पाटील, बाळासाहेब बंडगर, वसंतराव गायकवाड, एन. एम. हुल्याळकर आदी उपस्थित होते.
शेती व्यवसाय आता प्रतिष्ठेचा
अहिर म्हणाले की, पूर्वी शेती हा कमीपणाचा व्यवसाय समजला जात असे. आता मात्र, आपल्या शेतीमालाला जगभरातून मागणी आहे. तांदूळ, गहू उत्पादनात देश समृध्द झाला आहे. त्याच पध्दतीने देश तूर उत्पादनातही आघाडीवर आहे. येत्या काही दिवसात देशातील शेतीमालाला अधिक महत्त्व येणार असल्याने शेतीला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे.