Sangli: कोट्यवधी रुपयांच्या सोन्यासह पसार बंगाली कारागीर अखेर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 04:21 PM2024-09-19T16:21:44+5:302024-09-19T16:22:24+5:30

सांगली : आटपाडी येथील सराफांचे कोट्यवधी रुपयांचे सोने घेऊन पसार झालेल्या बंगाली कारागिरांच्या टोळीतील आणखी एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण ...

Bengali artisans finally arrested with gold worth crores of rupees | Sangli: कोट्यवधी रुपयांच्या सोन्यासह पसार बंगाली कारागीर अखेर ताब्यात

Sangli: कोट्यवधी रुपयांच्या सोन्यासह पसार बंगाली कारागीर अखेर ताब्यात

सांगली : आटपाडी येथील सराफांचे कोट्यवधी रुपयांचे सोने घेऊन पसार झालेल्या बंगाली कारागिरांच्या टोळीतील आणखी एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. ओरिसामधून ही कारवाई केली. लवकरच त्याला सांगलीत आणण्यात येणार आहे.

आटपाडी येथील गौतम दास व सौरभ दास या बंगाली कारागिरांनी अनेक वर्षे वास्तव्य करत सराफांचा विश्वास मिळवला होता. चोख सोने घेऊन दागिने तयार करून देण्याचा ते व्यवसाय करीत होते. नुकतेच सराफाकडून अडीच कोटी रुपये किमतीचे साडेतीन किलो सोने घेऊन बंगाली कारागीर पसार झाले होते. सराफ महेश्वर जवळे यांनीही बंगाली कारागिरांनी पावणेचार कोटींची फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलिसांत दिली होती.

आटपाडीतील गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी स्वरूप दास व विश्वनाथ दास या दोघांना पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. पण मुख्य संशयित अजूनही पसार होता. अखेर त्याला ओरिसा येथे ताब्यात घेतले आहे. त्याला लवकरच अटक करून सांगलीत आणण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Bengali artisans finally arrested with gold worth crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.