बचाव पक्ष-साक्षीदार यांच्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:29 AM2021-02-24T04:29:34+5:302021-02-24T04:29:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर ...

Between the defense and the witness | बचाव पक्ष-साक्षीदार यांच्यात

बचाव पक्ष-साक्षीदार यांच्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर सुरू आहे. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची साक्ष मंगळवारी पूर्ण झाली. बचाव पक्षाच्या वकिलांनी काळे यांचा उलटतपास घेतला. उलटतपासाच्या दरम्यान साक्षीदार काळे आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. यामुळे न्यायालयात शांतता पसरली. बचाव पक्षातर्फे ॲड. प्रमोद सुतार, सी. डी. माने आणि गिरीश तपकिरे यांनी काम पाहिले. बुधवारी पुन्हा खटल्याची सुनावणी होणार आहे.

लूटमारीच्या संशयावरून शहर पोलिसांनी अटक केलेल्या अनिकेत कोथळे याच्यावर अमानुषपणे थर्ड डिग्रीचा वापर केल्याने दि. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पोलीस ठाण्यातच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संशयितांनी अनिकेतचा मृतदेह आंबोली घाटातील निर्जनस्थळी जाळून खुनासारख्या गंभीर घटनेचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले या संशयितांच्या विरोधात खटला सुरू आहे.

दरम्यान, सांगली शहरच्या तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ. काळे यांचा सोमवारी (दि. २२) सरतपास न्यायालयासमोर नोंदवण्यात आला. त्यानंतर बचाव पक्षाने त्यांचा उलटतपास घेतला. सोमवारी ॲड. किरण शिरगुप्पे आणि विकास पाटील-शिरगावकर यांनी उलटतपास घेतला. पुन्हा बचाव पक्षाच्या वकिलांनी साक्षीदार काळे यांचा उलटतपास घेतला. बचाव पक्षाच्या वकिलांनी तांत्रिक मुद्द्यांवर भर दिला होता. उत्तरे देताना काळे यांची चांगलीच कोंडी झाली होती. दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि बचाव पक्षाच्या वकिलांची जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाली. बचाव पक्षाच्या वकिलांनी स्टेशन डायरीतील नोंद, त्यातील वेगवेगळे हस्ताक्षर, देण्यात आलेली फिर्याद खोटी आहे, आदी गोष्टींवर भर दिला. या दरम्यान साक्षीदार काळे आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यातही जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. सरकार पक्षातर्फे साहाय्यक सरकारी वकील प्रमोद भोकरे, सीआयडीचे उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.

Web Title: Between the defense and the witness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.