बेरोजगारांनो सावधान..! डमी वेबसाईटद्वारे घातला जाऊ शकतो गंडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:41+5:302021-07-14T04:30:41+5:30

अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना काळात लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाले असून बेरोजगारांची संख्याही वाढत आहे. या ...

Beware of the unemployed ..! Dummy can be inserted through the website Ganda! | बेरोजगारांनो सावधान..! डमी वेबसाईटद्वारे घातला जाऊ शकतो गंडा !

बेरोजगारांनो सावधान..! डमी वेबसाईटद्वारे घातला जाऊ शकतो गंडा !

Next

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना काळात लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाले असून बेरोजगारांची संख्याही वाढत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत अशा लोकांवर सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांनी आपले जाळे टाकले आहे. यातून फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे काेणताही ऑनलाईन जॉब स्वीकारण्यापूर्वी संबंधित संकेतस्थळांची तपासणी करण्याची गरज आहे.

बहुतांश लोकांनी सोशल मीडियावर आपल्या आवडी-निवडी, शैक्षणिक पात्रता, ईमेल, मोबाईल क्रमांक प्रोफाईलला टाकलेला असतो. त्यामुळे या लोकांना फसवणुकीसाठी टार्गेट करणे सोयीचे होते. याशिवाय ऑनलाईन म्हणजेच घरबसल्या जॉब करण्याची इच्छा तीव्र झाली की अंधपणाने आलेल्या ऑनलाईन ऑफरवर विश्वास ठेवला जातो. त्यातून असे लोक सायबर टोळ्यांच्या जाळ्यात अलगद अडकतात. कधी तुमची वैयक्तिक माहिती घेऊन फसवणूक केली जाते, तर कधी पोलिसांत किंवा न्यायालयात तक्रार करण्याच्या धमकीने फसवणूक केली जाते. त्यामुळे बेरोजगारांनी सावध राहिले पाहिजे.

चौकट

अशी करा खातरजमा

तुम्हांला ई-मेल आला असेल तर संबंधित कंपनीची माहिती सर्च इंजिनवर तपासून पहा. कंपनीचा मोबाईल क्रमांक आहे का, याचीही पाहणी करावी. खातरजमा झाल्याशिवाय कोणतीही माहिती शेअर करू नका

मोबाईलवर जर एखाद्या मोबाईलवरून जॉब ऑफर आली तर त्या मोबाईल क्रमांकाची ट्रू कॉलरवर तपासणी करा. त्यावरील लिंक थेट ओपन करण्याची चूक करू नका.

एखाद्या नामांकित कंपनीचे नाव सांगून ऑफर आल्यास संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन अशी काही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे का, हे पहावे

चौकट

संकेतस्थळाबाबत जास्तीत जास्त माहिती मिळवा

अनोळखी लिंक्सवर, संकेतस्थळावर जाण्याचे टाळा

धोकादायक व फेक संकेतस्थळांना, मोबाईल क्रमांकांना ब्लॉक करा

चौकट

अशी होऊ शकते फसवणूक

प्रकरण १

सांगली जिल्ह्यात काही महिला व पुरुषांना घरबसल्या ऑनलाईन टायपिंगची कामे दिली होती. सुरुवातीला छोटी ऑर्डर देऊन त्यांना त्याचे पैसे दिले गेले. मात्र, नंतर न झेपणारी मोठी ऑर्डर देण्यात आली. ते काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे कंपनीचा वकील बोलतोय म्हणून संबंधित काम करणाऱ्यास कॉल आला. ‘तुमच्यामुळे आमच्या कंपनीचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पैसे भरा, अन्यथा पोलिसांत व न्यायालयात तुमच्याविरोधात केस दाखल केली जाईल’ अशी धमकी देण्यात आली. या धमकीला घाबरून काही संबंधितांनी पैसे दिले, तर काहींनी त्या धमक्यांना भीक घातली नाही.

प्रकरण २

मेलद्वारे काहींना नोकरी ऑफर करण्यात आली. त्यानंतर बायोडाटा मागण्यात आला. त्यात ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, बँक खाते क्रमांकापासून मोबाईल क्रमांकापर्यंतची सर्व माहिती घेण्यात आली. त्याद्वारे खात्यावरील पैसे लुटण्यात आले.

प्रकरण ३

मोठ्या कंपन्यांच्या नावाने जॉब ऑफर दिल्यानंतर काहींना नोंदणीसाठी पैसे मागितले गेले. ५०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत या रकमा असल्याने अनेकांनी त्याचा सहज भरणा केला. नंतर या कंपन्यांनी दरवाजे बंद केले व किरकोळ रकमेसाठी झंजट नको म्हणून फसवणूक झालेल्यांनी पोलिसांत तक्रार केली नाही.

चौकट

जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना

२०१७ ३२

२०१८ ४०

२०१९ ३७

२०२१ मेअखेर २६

कोट

आलेल्या ई-मेलची खातरजमा करावी. काेणतीही लिंक ओपन करू नये. संबंधित कंपनी व जॉब ऑफर करणाऱ्याची खात्री पटल्याशिवाय माहिती देऊ नये. धमकी देऊन कोणी पैसे मागत असेल तर त्याला दाद देऊ नये. प्रसंगी पोलिसांत तक्रार द्यावी.

- संजय क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम सेल

Web Title: Beware of the unemployed ..! Dummy can be inserted through the website Ganda!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.