अभिजित जोशी यांना भारत गौरव सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:19 AM2021-02-05T07:19:40+5:302021-02-05T07:19:40+5:30

शिराळा : मूळचे शिराळा येथील रहिवासी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव, आयुर्वेद आणि योग विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अभिजित जोशी ...

Bharat Gaurav Sanman to Abhijit Joshi | अभिजित जोशी यांना भारत गौरव सन्मान

अभिजित जोशी यांना भारत गौरव सन्मान

Next

शिराळा : मूळचे शिराळा येथील रहिवासी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव, आयुर्वेद आणि योग विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अभिजित जोशी यांना ‘इंडो-युके कल्चर फोरम लंडन (इंग्लंड)’ यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘प्राईड ऑफ इंडिया ऑनर - २०२१ (भारत गौरव सन्मान)’ जाहीर झाला आहे. हा सन्मान सोहळा ब्रिटिश संसदेत पार पडणार आहे.

भारत आणि इतर देशांच्या संस्कृतीच्या संवर्धनाचे काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. या पुरस्काराचे वितरण इंग्लंडच्या ससंदेत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला असून, सोहळ्याची तारीख लवकरच कळविण्यात येणार आहे. डॉ. जोशी यांनी योग, आयुर्वेद आणि वेदामध्ये संशोधन केले आहे. ७ प्रबंध, ११ पुस्तके, ४७ रिसर्च पेपर तयार केले आहेत. या कामगिरीमुळे प्राईड ऑफ इंडिया ऑनर हा सन्मान डॉ. जोशी यांना घोषित करण्यात आला आहे. दि. २ फेब्रुवारी रोजी इंडो-युके कल्चर फोरम, अलमा वर्ल्ड लिमिटेडच्या वतीने प्राईड ऑफ इंडिया ऑनर - २०२१ पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा दिल्ली येथे सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, नेपाळचे केंद्रीय मंत्री राम बिर मनधर, वर्ल्ड बुक रेकॉर्डचे (इंग्लंड) संचालक डॉ. दिवाकर शुक्ला, संतोष शुक्ला, आदी उपस्थित राहणार आहेत.

फाेटाे : २५ अभिजित जाेशी

Web Title: Bharat Gaurav Sanman to Abhijit Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.