थकीत ऊस बिलासाठी आज तासगावात ‘भीक मागो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:18 AM2021-07-19T04:18:15+5:302021-07-19T04:18:15+5:30

ठिय्या मारलेले शेतकरी तासगावात घरोघरी जाऊन भाकरी मागतील, अशी माहिती ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. ...

'Bhik Mago' agitation in Tasgaon today for exhausted sugarcane bill | थकीत ऊस बिलासाठी आज तासगावात ‘भीक मागो’ आंदोलन

थकीत ऊस बिलासाठी आज तासगावात ‘भीक मागो’ आंदोलन

Next

ठिय्या मारलेले शेतकरी तासगावात घरोघरी जाऊन भाकरी मागतील, अशी माहिती ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. खराडे म्हणाले, तासगाव व नागेवाडी या दोन कारखान्यांची १५ जानेवारीपर्यंतची ऊस बिले दिलेली आहेत. मात्र, त्यानंतर गाळप झालेल्या उसाची बिले दिलेली नाहीत. ऊस गाळप होऊन सहा महिने उलटून गेले आहेत. कायद्याने गाळपानंतर १४ दिवसांत बिल देणे बंधनकारक आहे. या प्रश्नावर स्वाभिमानीच्या वतीने तीन आंदोलने करण्यात आली. प्रत्येक वेळी तारखा आणि आश्वासने देण्यात आली, पण ती पाळली नाहीत. २१ जून रोजी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, २० जून रोजी व्यवस्थापक आर.डी. पाटील चर्चेसाठी आले. त्यावेळी त्यांनी चेक दाखविले आणि २१ जूनपासून बिल देण्यास प्रारंभ करत आहोत. त्यामुळे आंदोलन स्थगित करा, अशी विनंती केली. मात्र, बिले अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळेच २० जुलैपासून तासगाव मार्केट यार्डातील खासदार संजयकाका पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनास बसलेले शेतकरी तासगावात घरोघरी जाऊन भाकरी मागून गुजराण करतील, भीक मागतील. मात्र, बिल मिळाल्याशिवाय हटणार नाहीत, असा निर्धार केला आहे.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी राजेंद्र माने, अशोक खाडे, दामाजी डुबल, गुलाबराव यादव, सचिन पाटील, भुजंग पाटील, संदेश पाटील, शशिकांत माने, महेश जगताप, संदीप शिरोटे, माणिक शिरोटे, धन्यकुमार पाटील, शिवाजी भोसले, सिद्धू जाधव, प्रदीप लाड, तानाजी सागर, कुंडलिक बाबर, गणेश शिंदे, सचिन महाडिक, अख्तर संडे, तानाजी धनवडे, सचिन चव्हाण, मुकेश चिंचवाडे, विनायक पवार, राहुल शेडबाले कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

Web Title: 'Bhik Mago' agitation in Tasgaon today for exhausted sugarcane bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.