Sangli: टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याचे २ ऑक्टोंबरला भूमिपूजन, सुहास बाबर यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 03:51 PM2024-09-24T15:51:31+5:302024-09-24T15:54:46+5:30

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

Bhoomipujan of 6th phase of Tembhu Yojana on 2nd October Information given by Suhas Babar | Sangli: टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याचे २ ऑक्टोंबरला भूमिपूजन, सुहास बाबर यांनी दिली माहिती

Sangli: टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याचे २ ऑक्टोंबरला भूमिपूजन, सुहास बाबर यांनी दिली माहिती

दिलीप मोहिते

विटा : खानापूर, आटपाडीसह विसापूर सर्कलमधील वंचित शेतीला पाणी देणासाठी विशेष मंजुरी मिळालेल्या टेंभू योजनेच्या ६ वा अ व ६ वा ब या दोन्ही टप्प्याचे भूमिपूजन दि. २ ऑक्टोंबर रोजी विटा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

सुहास बाबर म्हणाले, दिवंगत आ. अनिल बाबर हे टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठी आपले आयुष्य जगले. खानापूर मतदारसंघातील एकही गाव टेंभूपासून वंचित राहू नये, यासाठी त्यांनी योगदान दिले. त्यांच्या आयुष्यातील शेवटची इच्छा ही टेंभू योजनेचा ६ वा टप्पा पूर्ण करून वंचित गावांना पाणी देण्याची होती. या टप्प्याला मंजुरी देऊन ती इच्छा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रीमंडळाने पूर्ण केली आहे.

या ६ व्या टप्प्याचे भूमिपूजन दि. २ आॅक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता विटा येथील रेवानगर (सुळेवाडी) येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. यावेळी विट्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी तानाजीराव पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक अमोल बाबर, कृष्णत गायकवाड, उत्तम चोथे, अनिल म. बाबर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

‘टेंभू’च अनिलभाऊंचे खरे स्मारक..

दिवंगत आ. अनिल बाबर हे शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी मिळावे यासाठी जगले. आता ६ व्या टप्प्याच्या माध्यमातून त्यांचे शेवटचे काम पूर्ण होत आहे. या योजनेची पूर्तता हेच आ. अनिलभाऊंचे खरे स्मारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विटा येथील मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन सुहास बाबर यांनी केले.

Web Title: Bhoomipujan of 6th phase of Tembhu Yojana on 2nd October Information given by Suhas Babar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.