भोसे, सोनी, पाटगाव, करोली येथे जणू सुपाने गारा ओतल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 06:19 PM2021-04-29T18:19:43+5:302021-04-29T18:21:52+5:30
Rain Sangli : मिरज पूर्व भागातील काही गावांना गुरुवारी दुपारी वळीवाच्याय पावसाने झोडपून काढले. गारांचा वर्षाव झाला. भोसे, सोनी, पाटगाव, करोली आदी भागात सुमारे पाऊण तास गारा पडत होत्या. शिवाय आरग, बेडग, एरंडोली, मालगाव, कळंबी, तानंग आदी गावांत जोरदार वादळी पाऊस झाला. गारांच्या वर्षावाने खरडछाटणी झालेल्या द्राक्षवेलींची हानी झाली.
संतोष भिसे
सांगली : मिरज पूर्व भागातील काही गावांना गुरुवारी दुपारी वळीवाच्याय पावसाने झोडपून काढले. गारांचा वर्षाव झाला. भोसे, सोनी, पाटगाव, करोली आदी भागात सुमारे पाऊण तास गारा पडत होत्या. शिवाय आरग, बेडग, एरंडोली, मालगाव, कळंबी, तानंग आदी गावांत जोरदार वादळी पाऊस झाला. गारांच्या वर्षावाने खरडछाटणी झालेल्या द्राक्षवेलींची हानी झाली.
वेलींना जखमा झाल्याचे बागायतदारांनी सांगितले. दुपारी दिड-दोन वाजल्यापासून ढग दाटून येत होते. साडेतीनपासून पावसाने झोडपायला सुरुवात केली. उकाड्याने हैराण झालेल्या ग्रामस्थांना यामुळे दिलासा मिळाला. शेतातील सरीत पाणी साचून राहिले. भोसेमध्ये रस्त्यांवर तसे शेतात गारांची चादर पसरली. सदैव दुष्काळाशी सामना करणार्या या गावांना गारांचा हा अनुभव मन प्रसन्न करणारा ठरला.