तब्बल २६ वर्षांपासून प्रलंबित हिऱ्याळ पुलाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:31 AM2021-08-21T04:31:12+5:302021-08-21T04:31:12+5:30
जत : जत तालुक्यातील उमराणी - सिंदुर रस्त्यावरील हिऱ्याळ पुलाचे भूमिपूजन नुकतेच झाले. पाटबंधारे विभागाच्या हिऱ्याळ तलावाचे काम १९९५ला ...
जत : जत तालुक्यातील उमराणी - सिंदुर रस्त्यावरील हिऱ्याळ पुलाचे भूमिपूजन नुकतेच झाले. पाटबंधारे विभागाच्या हिऱ्याळ तलावाचे काम १९९५ला पूर्ण झाले होते. परंतु, हा तलाव उमराणी - सिंदुर गावाला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाल्याने हा रस्ता रहदारीचा ठरला होता. मात्र त्यावर पूल नव्हता. उमराणीचे आप्पासाहेब नामद हे पुलाला मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न करत होते. खासदार संजयकाका पाटील मध्यंतरी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष झाल्यानंतर मंजुरीसाठी अधिक गती मिळाली. सर्वेक्षणही झाले. आता जयंत पाटील यांच्याकडे जलसंधारणाचा विभाग असल्याने आप्पासाहेब नामद यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा केला. पाटील यांना विशेष कार्य अधिकारी अमोल डफळे यांनीही सहकार्य केले. सहा महिन्यांत हिऱ्याळ पुलाच्या कामासाठी एक कोटी वीस लाखांचा निधी मंजूर करून निविदा काढायला लावली.
या पुलाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, अमोल डफळे, आप्पासाहेब नामद यांच्या हस्ते झाले. यावेळी युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण, पंचायत समिती सदस्य रामाण्णा जिवाण्णवर, शिवाप्पा तावशी, राहुलसिंह डफळे, बिळुरचे सरपंच नागनगौडा पाटील, सिंदुरचे सरपंच गंगाप्पा हारुगेरी, उमराणीचे सरपंच विजयकुमार नामद, संजय शिंदे उपस्थित होते.
200821\1754-img-20210820-wa0028.jpg
२६ वर्षांपासून प्रलंबित असलेले उमराणी सिंदुर रस्त्यावरील हिऱ्याळ पुलाचे भुमीपुजन झाले.