कोकळे येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:19 AM2021-07-18T04:19:29+5:302021-07-18T04:19:29+5:30
कवठेमहांकाळ : कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे महांकाली नदीवर कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते ...
कवठेमहांकाळ : कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे महांकाली नदीवर कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या बंधाऱ्याची क्षमता १ लाख ३९ हजार २८४ घनमीटर असून, सिंचन क्षमता ४४ हेक्टर आहे. या बंधाऱ्यामुळे कोकळे गावातील शेतीचा विकास होण्यास मदत होणार आहे, असे आमदार सुमनताई पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, काँँग्रेसचे नेते धनाजीराव पाटील, माजी सभापती दत्ताजीराव पाटील, पिंटू कोळेकर, जिल्हा परिषद सदस्या आशाराणी पाटील, माजी सभापती सुरेखा कोळेकर, पंचायत समितीचे सभापती विकास हाक्के, उपसभापती नीलम पवार, कोकळेचे सरपंच धनाजीराव भोसले, उपसरपंच विजय तोडकर, माणिकराव भोसले, जयसिंगराव पाटील, वासुदेव ओलेकर, बाळासाहेब ओलेकर, भगवान दुधाळ, भारत माने, पिंटू कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.