शिराळा तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी भूषण देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:48 AM2021-03-04T04:48:37+5:302021-03-04T04:48:37+5:30

शिराळा : शिराळा तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. भूषण देशपांडे, तर सचिवपदी ॲड. विलास झोळे- पाटील यांची निवड झाली. ...

Bhushan Deshpande as the President of Shirala Taluka Bar Association | शिराळा तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी भूषण देशपांडे

शिराळा तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी भूषण देशपांडे

Next

शिराळा : शिराळा तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. भूषण देशपांडे, तर सचिवपदी ॲड. विलास झोळे- पाटील यांची निवड झाली.

शिराळा तालुका वकील संघटनेच्या उपाध्यक्षपदी ॲड. एस. आर. पाटील, सहसचिवपदी ॲड. सुप्रिया देशपांडे यांची निवड झाली. वकील संघटनेच्या झालेल्या बैठकीमध्ये सल्लागार मंडळ सदस्य ॲड. जी. एम. पवार, ॲड. पी. एम. जोशी, ॲड. के. पी चव्हाण, ॲड. जी. एल. पाटील, ॲड. ए. पी. नाईकवडी यांनी नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर केली. नूतन पदाधिकारी यांना पदभार देऊन त्यांचा वकील संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ॲड. रवी पाटील, ॲड. शिवराज पाटील, ॲड. जी. एम. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. उमेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. वीरेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.

Web Title: Bhushan Deshpande as the President of Shirala Taluka Bar Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.